Headlines

Case registered against police constable for allegedly defrauding female lawyer in Baramati; महिला वकिलाला प्रेमात पाडलं, बारामतीतील लॉजवर संबंध, पण वेळ येताच हात झटकले; पोलिसावर गुन्हा दाखल


दीपक पडकर, बारामती : लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वकिलाची फसवणूक, तिचे लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा घेणे, तसेच मुलीचा स्वीकार करण्यास नकार देत धमकावल्या प्रकरणी पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली असून, तिचा उल्लेख “निर्भया” या काल्पनिक नावाने करण्यात आला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, रमेश मोहन जाधव (पोलीस हवालदार, बकल क्र. ५६१, सध्या नियुक्ती – खडकी, पुणे, मूळ रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९, ८१, ३५१(२), ३५१(३) आणि ३१८ अंतर्गत २७ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयीन कामातून ओळख, नंतर प्रेमाचे आश्वासन

फिर्यादीनुसार, पीडित महिला व्यवसायाने वकील असून सन २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान आरोपीची तिच्याशी ओळख झाली. सुरुवातीला न्यायालयीन प्रकरणाच्या निमित्ताने सुरू झालेला संवाद पुढे मोबाईल फोन, संदेश आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमधून वाढत गेला. आरोपीने स्वतःचे पहिले वैवाहिक जीवन संपुष्टात आले असून पत्नीपासून अनेक वर्षांपासून विभक्त राहत असल्याचे सांगत फिर्यादीशी कायदेशीर विवाह करण्याचे वारंवार आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“तूच माझी होणारी पत्नी आहेस”, “आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही” अशा भावनिक शब्दांद्वारे आरोपीने तिचा विश्वास संपादन केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केलं आहे. त्यानंतर आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून त्याने पीडितेकडून ४० हजार रुपये घेतले. त्याच दिवशी आरोपीने फिर्यादीला बारामती येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे पुन्हा विवाहाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक करत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपीने आपल्या नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केली. त्यामुळे आरोपीचे आश्वासन खरे असल्याचा फिर्यादीचा विश्वास अधिक दृढ झाला. काही दिवसांनी आरोपीने एका मंदिरात फिर्यादीच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील साखळी मंगळसूत्र म्हणून घालून “आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस” असे सांगितले. त्यानंतर जेऊर व निंभोरे परिसरात फिर्यादीला पत्नी म्हणूनच परिचय करून देत काही काळ तिच्यासोबत सहजीवन केले. सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली. गर्भधारणेनंतर आरोपीचे वर्तन बदलले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिची कोणतीही शारीरिक, मानसिक अथवा आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. उलट संशय घेऊन वाद घालणे, मानसिक त्रास देणे, आवश्यक उपचारासाठी मदत न करणे तसेच गर्भधारणेदरम्यान तिला एकटीला सोडून देणे अशा प्रकारे वागणूक दिली. दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीला कन्यारत्न प्राप्त झाले. सदर मुलगी आरोपीपासून झालेली असून तोच तिचा जैविक पिता असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. मात्र मुलीच्या जन्मानंतरही आरोपीने मुलीला स्वीकारण्यास नकार दिला. तिची भेट घेतली नाही, अशी फिर्यादीची तक्रार आहे.

दरम्यान, या प्रकरणात तपासादरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ, बारामती येथील लॉजची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, मंदिरातील सीसीटीव्ही, जेऊर व निंभोरे येथील साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय उपचार व प्रसूतीचे अभिलेख, आर्थिक व्यवहारांचे बँक रेकॉर्ड तसेच इतर डिजिटल व दस्तऐवजीय पुरावे जप्त करून त्यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत