Pune Metro News: पुण्यामध्ये पिंपरी – चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.विस्ताराचा डीपीआर देखील सादर करण्यात आला.

प्रकल्प आराखडा सादर
शहराच्या विकासाचा वेग लक्षात घेऊन मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या गरजांसाठी नव्हे; तर पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावे. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या ‘डीपीआर’मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, या अनुषंगाने ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्प आराखडा सादर केला.
उपस्थिती
महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, रिपब्लिकन पक्षाचे कुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठिया या वेळी उपस्थित होते.
सुसंगत नियोजनाची सविस्तर माहिती
बैठकीत हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रस्तावित मेट्रो विस्ताराचे सादरीकरण केले. प्रस्तावित मार्ग, त्यांची व्यवहार्यता, प्रवासी क्षमता, भविष्यातील विस्तार, विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी समन्वय; तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’
मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावे, यासाठी बससेवा, पार्किंग, मल्टि-मोडल कनेक्टिव्हिटी, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ यांचा प्रभावी समावेश असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या सुविधांमुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
‘रिंग मेट्रो’चेही स्वप्न !
सुमारे १२ हजार ९३७ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित भक्ती-शक्ती – वाकड – नाशिक फाटा – चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण करताना या शहरासाठी ‘रिंग मेट्रो’चे स्वप्नही साकार होणार असल्याचा दावा करण्यात आला.
प्रस्तावित ३४ मेट्रो स्थानके
भक्ती- शक्ती चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर ,आदर्शनगर , मुकाई चौक, रावेत,पुनावळे गाव, पुनावळे , ताथवडे गाव, ताथवडे ,भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागार, पिंपळे गुरव,नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर,गवळी माथा चौक, सेंच्युरी,एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर-१ ,गोडाउन चौक, पीआयईसीसी,भारतमाता मोशी, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण

