Headlines

‘बजाज पल्सर एन 125’ मॉडेल भारतातून बंद होणार


नवी दिल्ली : बजाज ऑटोने भारतात आपली ‘पल्सर एन125’ दुचाकी बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली, ही दुचाकी भारतीय बाजारपेठेत दोन वर्षेही पूर्ण करू शकली नाही. कंपनीने देशातील डीलर्सना तिचा पुरवठा थांबवला आहे. कमी विक्रीमुळे, कंपनीने ही दुचाकी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्याचा निर्णय घेतला.

पुरेशा प्रमाणात विक्री न होणाऱ्या दुचाकी बंद करण्याचा बजाज ऑटोचा इतिहास आहे. पल्सर एन125 हे याचेच एक नवीन उदाहरण आहे. दरम्यान, ही दुचाकी अजूनही बजाजच्या भारतीय वेबसाइटवर दिसत आहे. सदरची दुचाकी ही  पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली होती. पल्सर एन125 केवळ एक नवीन व्हेरिएंट नव्हती, तर ती पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली होती. हा प्लॅटफॉर्म इतर कोणत्याही पल्सर बाईकसोबत शेअर केला गेला नव्हता.

यात नवीन इंजिन आणि पूर्णपणे नवीन चेसिस होती, ज्यामुळे दुचाकीचे वजन फक्त 125 किलो ठेवण्यास मदत झाली. यासोबतच, कंपनीने यात एक पूर्णपणे नवीन स्टायलिंग सादर केली, जी बाजारातील इतर दुचाकीपेक्षा बरीच वेगळी होती.

डिझाइन आवडले नाही

भारतीय ग्राहकांना या दुचाकीचा सडपातळ आणि रुंद लुक आवडला नाही. याच्या तुलनेत बाजारातील हिरो एक्स्ट्रीम 125आर आणि होंडा सीबी125 हॉर्नेट यांसारख्या इतर बाईक्स खूप लोकप्रिय ठरल्या आहेत. या बाईक्स त्यांच्या वास्तविक क्षमतेपेक्षा मोठ्या आणि अधिक स्पोर्टी दिसतात, जे ग्राहकांना आकर्षित करते. भारतात विक्री बंद झाली असली तरी, पल्सर एन 125 चा प्रवास संपलेला नाही. कंपनी ही बाईक अनेक परदेशी बाजारपेठांमध्ये विकणे सुरू ठेवणार आहे. यामध्ये नेपाळ, पेरू, कोलंबिया आणि मोरोक्कोसारख्या देशांचा समावेश आहे.

मात्र, ही बाईक किंवा तिचा प्लॅटफॉर्म भविष्यात बदललेल्या लूकमध्ये आणि अधिक वैशिष्ट्यांसह भारतात परत येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत