Lionel Messi Retirement News : लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये नेल्यानंतर मेसीने हा निर्णय घेतला.

‘हा निर्णय घेताना खूप दुःख झालं’
मेसीने आपल्या पोस्टमध्ये निवृत्तीचा निर्णय अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. हा निर्णय घेताना आपल्याला खूप दुःख झाले आणि अजूनही होत असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मेसीने स्पष्ट केले. “मी नेहमीच माझं सर्वस्व दिलं आहे. केवळ गेल्या काही वर्षांत आम्ही जे काही जिंकलो त्यासाठीच नाही, तर त्याआधीही मी अर्जेंटिनाच्या जर्सीसाठी संघर्ष केला आणि सर्वस्व झोकून दिलं,” असं मेस्सीने म्हटलं.
मेस्सीची पोस्ट जशास तशी
“फायनलला इतका वेळ उलटून गेल्यानंतर, खूप विचार केल्यानंतर मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेत आहे. हा निर्णय घेताना खूप वेदना झाल्या आणि आजही मनाला त्याची वेदना होत आहे. पण आता हीच योग्य वेळ आहे, हे मला समजत आहे. मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की, मी नेहमीच माझं सर्वस्व दिलं. केवळ गेल्या काही वर्षांत, जेव्हा आपण सर्व काही जिंकलो, तेव्हाच नाही तर त्याआधीही मी या जर्सीसाठी, या संघासाठी नेहमीच सर्वस्व पणाला लावलं. तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि फुटबॉलच्या माध्यमातून अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा, यासाठी मी नेहमीच संघर्ष केला.
आता फार वेळ शिल्लक नाही आणि काही काही टप्पे संपत चालले आहेत. त्यापैकी हा एक टप्पा आहे, जो मला खूप त्रास देतोय. मला अर्जेंटिना संघाचा भाग असणं आवडत होतं, आजही आवडतं आणि कायम आवडत राहील. मी माझं सर्वस्व दिलं आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काहीच उरलेलं नाही. शिवाय, माझ्या मागे काही खूपच चांगले युवा खेळाडू आहेत, जे संघात स्थान मिळवण्यास पात्र आहेत.
Indian Cricketers : प्रेम झालं, नातं बहरलं, लग्नापर्यंत गेलेला विषय पण टीम इंडियाच्या ५ क्रिकेटर्सची प्रेमकहाणी अधुरीच राहिली, पाहा कोण?
गेल्या २० वर्षांपासून दिलेल्या प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. मैदानाच्या आतून तुमचा आवाज ऐकण्याची मला खूप आठवण येईल. आता मी तुमच्यापैकीच एक असणार आहे. बाहेरून संघाला नेहमीच पाठिंबा देत राहीन, चांगल्या काळातही आणि वाईट काळात तर त्याहूनही जास्त.
माझ्या कुटुंबाचेही आभार. या सुंदर, पण तितक्याच कठीण प्रवासात त्यांनी नेहमी माझी साथ दिली आणि माझ्यासोबत राहिले. माझ्यासोबत काम केलेल्या प्रत्येक प्रशिक्षकाचे, सहकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार. त्यांच्यासोबत घालवलेल्या असंख्य आठवणी आणि अविस्मरणीय क्षण मी कायम माझ्यासोबत घेऊन जाईन.
माझ्या मनात आता एकच समाधान आणि अभिमान आहे की, माझ्या सहकाऱ्यांसोबत मिळून मी तुम्हाला काही स्वप्नवत क्षण अनुभवायला दिले. हे सर्व तुमच्यासोबत जगता आलं, हीच एक वेडी करणारी अनुभूती होती. तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे.
देवा, तू मला अर्जेंटिनाचा नागरिक बनवलंस, यासाठी तुझे आभार.
चला, अर्जेंटिनासाठी लढूया!
ही पोस्ट मी २१ जुलै रोजी, फायनलच्या दोन दिवसांनंतर लिहिली होती. आता माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी या निर्णयाबाबत पूर्वीपेक्षाही अधिक ठाम झालो आहे.”

