Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योग लोकप्रिय झाला, पण‎ जीवनावश्यक होणे बाकी




उद्या संपूर्ण जग योगासाठी सज्ज असेल. भगवान शिव आणि माता‎पार्वती यांनी एकांतामधील चर्चेचे संपादन महर्षी पतंजली यांनी केले‎ आणि त्यातूनच योगाची निर्मिती झाली. आज योगाची लोकप्रियता ‎वाढली. त्याच्या परिणामावर विविध दृष्टिकोनातून विद्वान आपली मते‎ मांडतात. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी एवढेच सांगू शकतो की, ‎योगामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोन कमकुवत बाजू गुणांत ‎रूपांतरित होतात. एक म्हणजे लाजाळूपणा व दुसरा म्हणजे संकोच.‎ आजच्या जगात तुम्ही लाजाळू असाल तर नुकसान सहन करावे‎ लागते व संकोची असल्यास संधी गमवाव्या लागतात. लाजाळूपणा‎ एक भावनिक प्रतिक्रिया असते, तर संकोच ही एक व्यावहारिक. पण ‎नियमित योगाभ्यास केल्यास लाजाळूपणाचे रूपांतर शिस्तीत होते व‎ संकोची स्वभावामुळे माणूस मर्यादांचे भान राखणारा बनतो. हे दोन्ही‎ गुण योगाच्या माध्यमातून सहज प्राप्त होऊ शकतात. योग आज ‎लोकप्रिय झाला . परंतु तो जीवनातील आवश्यक घटक बनणे अजून‎ बाकी आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत