![]()
माणसाच्या नसानसात भिनते आणि कुटुंबांची आचारसंहिता बनते,असे फार थोडेच साहित्य असते. अशात एका साहित्याचे नाव म्हणजे- रामचरितमानस. याचे रचनाकार तुलसीदास यांची आज जयंती आहे.गेल्या काही वर्षांत तुलसीदास यांना केवळ एक साहित्यिक मानूनकार्यक्रम केले गेल्याचे दिसते. वास्तविक ते मानसशास्त्रज्ञ ऋषी होते.रामचरितमानस रचून आता 450 वर्षे पूर्ण झाली. या ग्रंथाची रचनाकरण्यासाठी 2 वर्षे, 7 महिने व 26 दिवस लागले होते. त्या वेळीतुलसीदास 80 वर्षांचे होते. वय ही अडचण ठरते असे कोण म्हणते?उलट वय वाढते तशी सृजनक्षमता अधिक समृद्ध होते. शब्दांच्यानिर्मितीची किती अनोखी रूपे असू शकतात, याचे रामचरितमानस हेजिवंत उदाहरण आहे. तुलसीदासांना 126 वर्षांचे आयुष्य लाभले. यासव्वाशे वर्षांत त्यांनी हजारो वर्षांचे काम करून ठेवले. आपणत्यांच्याकडून एक धडा घ्यावा. देवावर अढळ श्रद्धा ठेवावी, आपलीयोग्यता सतत वाढवत राहावी. वयाच्या टप्प्यावर कोणती कामे करावीतअन् कोणती करू नयेत, याकडे लक्ष द्यावे.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सृजनाच्या अनोख्या रूपांचे प्रमाण म्हणजे रामचरितमानस
