![]()
ईश्वराने माणसाच्या अंत:करणात जीवन चालवणारी अशी कोणतीव्यवस्था केलेली असेल बरे? संत-महात्मे तिला त्रिगुण व्यवस्था असेम्हणतात. आपले जीवन तीन गुणांद्वारे चालते. सत्त्वगुण म्हणजे आपणचांगली कर्मे करतो, रजोगुण आपल्या लाभ-हानीच्या विचारांना चालनादेतो, तर तमोगुण चुकीच्या मार्गाकडे नेतो. पैकी प्रभावी गुणामागे उर्वरितदोन गुण चालतात. गोस्वामी तुलसीदासांनी लिहिले आहे “माया बस्यजीव अभिमानी, ईस बस्य माया गुन खानी.” म्हणजे अभिमानी जीवमायेच्या अधीन असतो आणि तीनही गुणांची खाण माया ही ईश्वराच्याअधीन असते. तुलसीदासांच्या मते, जीवनात अहंकार मायेच्याप्रभावाखाली असतो. मायेला तीन गुणांची खाण म्हणतात. जीवनातसत्त्वगुण वाढवायचा झाल्यास ईश्वराशी नाते जोडावे. सोप्या भाषेतसांगायचे तर सत्त्वगुण म्हणजे सकारात्मकता. परमेश्वराशी जोडण्याचेप्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. मात्र जीवनात संतुलन राखले,तर हे तीनही गुण नियंत्रणात राहून व्यक्तिमत्त्व सकारात्मकतेने परिपूर्णहोईल.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तिन्ही गुण नियंत्रणात ठेवा, व्यक्तिमत्त्व सकारात्मक होईल
