Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नव्या पिढीबाबत क्षमा करण्याची सवय लावा




व्यवसायाच्या जगात अनुभवी व वयाने मोठी माणसे अनेकदा तक्रार करतात की, नव्या पिढीची काम करण्याची पद्धत त्रासदायक ठरते. ही पिढी नोकऱ्या इतक्या सहज बदलते, जणू शेंगदाणे खाऊन त्याची टरफले फेकून दिली. घरातही या पिढीबद्दल अशीच तक्रार ऐकायला मिळते. मात्र, यात या पिढीचा दोष नाही. संपूर्ण निसर्ग बदलला आहे किंवा आपण तो बदलून टाकला आहे. अशा परिस्थितीत जुन्या पिढीप्रमाणेच आजची मुलेही वागतील, अशी अपेक्षा करणे शक्य नाही. या मुलांशी वागताना काही शब्दांकडे लक्ष देण्याची गरज आहे. लाड आणि हट्ट : लाड या शब्दाचा एक अर्थ अभिमान तर दुसरा अर्थ माया होतो. हट्ट म्हणजे आग्रह. या दोन्ही गोष्टी या पिढीत जन्मत:च दिसून येतात. त्याचप्रमाणे राग आणि ओरड रागात थोडी सूडाची भावना तर ओरडण्यामागे बदल घडवण्याची इच्छा असते. मुलांवर राग काढण्यापेक्षा त्यांना समज देणे अधिक योग्य ठरते. तसेच, या पिढीला समजून घेत त्यांना क्षमा करण्याची सवय लावा. कारण एखाद्याला क्षमा करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण अधिक सकारात्मक बनते.कधी ना कधीततरी मुलांना त्याची जाणीव होईल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत