Headlines

नारळी पौर्णिमेपासून समुद्रात गजर; सात बोटी सज्ज, 30 हजार परप्रांतीय कामगारांवर मासेमारी हंगामाची भिस्त


नारळी पौर्णिमेपासून समुद्रात पुन्हा मासेमारीसाठी बोटी उतरणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. पण यंदा मासेमारी हंगामाची भिस्त ही तब्बल 30 हजर परप्रांतीय कामगारांवर असल्याची माहिती समोर येत आहे.

raigad news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना समुद्राचे वेध लागले आहेत. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात करण्याची कोकणातील परंपरा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मच्छिमार बोटी सज्ज करण्याच्या कामात व्यस्त असून, पहिल्या टप्प्यात सात बोटी परवाना घेऊन समुद्रात रवाना होणार आहेत.

30 हजार परप्रांतीय कामगारांवर भिस्त

दरम्यान, बोटीवर काम करण्यासाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून सुमारे 25 हजार पुरुष, तर मासळी वेगळी करणे, सुकवणे आदी कामांसाठी सुमारे पाच हजार महिला कामगार रायगडात दाखल होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या मासेमारी हंगामाची भिस्त तब्बल 30 हजार परप्रांतीय कामगारांवर राहणार आहे.

यंदा 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीला होती बंदी

दरवर्षी 1 जूनपासून मासेमारी बंदीचा कालावधी सुरू होतो आणि 31 जुलैला संपतो. मात्र, यंदा मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत होती. बंदी संपल्यानंतरही समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांना तातडीने समुद्रात जाता आले नाही. उंच लाटांचा मारा कायम असल्याने समुद्र शांत होण्याची प्रतीक्षा मच्छिमार करीत आहेत. मात्र, नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर मासेमारीला सुरुवात करण्यासाठी बोटींची डागडुजी, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती आणि इतर कामांना वेग आला आहे.

Maharashtra TimesMumbai Underworld : नवऱ्याचा बदला घेण्यासाठी शारजाह स्टेडियमध्ये दाऊदची फिल्डिंग, ऐनवेळी दगाफटका, मुंबईची लेडी डॉन सपना दिदी कोण?

परप्रांतीय कामगारांची भूमिका महत्त्वाची

मासेमारी व्यवसायात परप्रांतीय कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. गावाकडे गेलेले अनेक कामगार आता पुन्हा बंदरात दाखल होऊ लागले आहेत. काही कामगार दरवर्षी ठराविक बोटीवरच काम करण्यासाठी येतात. मात्र, नव्याने येणाऱ्या कामगारांची ओळख निश्चित करण्यासाठी त्यांची बायोमेट्रिक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संबंधित गावातील रहिवासी दाखला सादर करावा लागणार आहे.

कामगारांची नोंदणी केली जाणार

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज कोणत्या बोटीवरून किती कामगार समुद्रात गेले आहेत, याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाकडे उपलब्ध राहणार आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास समुद्रात किती मच्छिमार आहेत, याची माहिती बचाव पथकाला तत्काळ मिळू शकते. त्यामुळे स्थानिकांसह परप्रांतीय कामगारांची माहिती संकलित केली जात आहे.

कामगारांना किती पैसे मिळतात?

मासेमारीच्या प्रकारानुसार कामगारांची संख्या वेगवेगळी असते. डोली मासेमारीसाठी साधारण पाच, पर्सनेट मासेमारीसाठी आठ, तर एलईडी मासेमारीसाठी किमान १५ कामगारांची आवश्यकता असते. अनुभवी नाखव्याला दिवसाला सुमारे १५०० रुपये, तर इतर कामगारांना सुमारे एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते. याशिवाय कामगारांच्या जेवणाचा खर्चही बोटमालकाला करावा लागतो.

Maharashtra TimesFDA Strict Action : नवी मुंबईत दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 4710 लिटर दूध केलं नष्टखोल समुद्रातील मासेमारीसाठी बोटी ५० ते ७० वाव खोल समुद्रात जातात. एका फेरीसाठी साधारण १० ते १२ दिवस लागतात. एका फेरीवर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. मोठ्या बोटी समुद्रात गेल्यानंतर एक-दोन आठवडे परत येत नसल्याने मजुरी, जेवण आणि इंधनाचा मोठा खर्च बोटमालकाला सहन करावा लागतो. मासळी मिळाली नाही तरी कामगारांचा खर्च मात्र बोटमालकाच्याच माथी पडतो.

स्थानिक तरुणांना प्रशिक्षणाची गरज

एकीकडे विविध प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली जाते; मात्र मासेमारी व्यवसायात स्थानिक तरुणांचा सहभाग कमी असल्याचे चित्र आहे. स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना बोटीवर रोजगार उपलब्ध करून दिल्यास परप्रांतीय कामगारांवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच मच्छिमारांचा खर्चही कमी होऊ शकतो. मात्र, सध्या स्थानिक तरुण बोटीवर काम करण्यास फारसे तयार नसल्याने परराज्यातील कामगारांवरच मच्छिमारांना अवलंबून राहावे लागत आहे.

अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“नारळी पौर्णिमेपासून मासेमारीसाठी समुद्रात जाण्यासाठी सात बोटी परवाना घेऊन सज्ज झाल्या आहेत. बोटीवर काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी कामगार आणि बोटमालकांसाठी तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे,” असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग जलील पटेल यांनी सांगितले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा