Headlines

नव्या रिंग रोडमुळे नागपूर ते हैदराबाद 3.5 तासांत, समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार; कसे-कुठे असतील महामार्ग?| Maharashtra Times


Nagpur-Chandrapur Highway: समृद्धी महामार्गाचा विस्तार करून पुढे चंद्रपूरपर्यंत जोडण्यात येणार आहे. चंद्रपूर शहराभोवती रिंग रोड तयार करून पुढे हैदराबादपर्यंत जोडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र महामार्ग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर: सध्या नागपूरवरून हैदराबादपर्यंत पोहोचण्यासाठी 500 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. पण येत्या काही वर्षांमध्ये हे अंतर केवळ तीन ते साडेतीन तासांत पार होणार आहे. नागपूर आणि हैदराबादला जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गाचं निम्म्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

समृद्धीचा कसा होणार विस्तार ?

महाराष्ट्र सरकारने नागपूर आणि चंद्रपूरला जोडणाऱ्या सहा पदरी महामार्गाला मंजुरी दिली आहे. चंद्रपूरभोवती एक रिंग रोड म्हणजे एक वर्तुळाकार मार्ग तयार करून तो थेट हैदराबादपर्यंत जोडला जाणार आहे. याशिवाय तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील शहरांना जोडणाऱ्या महमार्गांचं कामही सुरू करण्यात आलं आहे. समृद्धी महामार्गाला गोंदियापर्यंत जोडणार आहे. त्यापुढे एक स्पर मार्ग बांधून तो पुढे रायपूरपर्यंत घेऊन जाण्यात येईल. याशिवाय जबलपुरवरूनही एका नव्या महामार्गाचं काम सुरू करण्यात आलं असल्याची माहिती नितीन गडकरींनी यावेळी दिली.

Maharashtra TimesKhandesh Expressway: जळगाव ते संभाजीनगर एका तासात, मुंबई पाच तासांत, ‘खान्देश एक्सप्रेवे’मुळे फायदा होणार; कोणत्या गावांचा समावेश?

नागपूर ते चंद्रपूर ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गासाठी राज्य सरकारने 2.353 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा मार्ग 204 किमी लांब असेल. नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा विस्तार करून नागपूर ते चंद्रपूर हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. MSRDC या मार्गासाठी भूसंपादन करून बांधकाम सुरू करणार आहे.

नागपूर ते चंद्रपूर महामार्ग

समृद्धी महामार्गाच्या सेलडो इंटरचेंजपासून हा मार्ग सुरू होईल. त्यापुढे दुर्ग-हैदराबाद महामार्गावर नावेगाव (मोर)पर्यंत जाईल. या पट्ट्यात 192 किलोमीटर अंतर पार केलं जाईल. त्यापुढे आणखी 11 किमी लांब मार्गाने चंद्रपूरपर्यंत जोडण्यात येईल. या महामार्गासाठी MSRDCला 2000 हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे.

येत्या काही वर्षांमध्ये नागपूरचा कायापालट होणार आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले. NHAI ने तब्बल 60 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय शहरातील लोकांसाठी अनेक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. शहरात 25 स्विमिंग पूल बांधण्याची योजना आहे. तसचे, येत्या पाच वर्षांमध्ये एक लाख मुलांसाठी मैदान बांधले जातील.

Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: शिळफाट्याजवळ बुलेट ट्रेनसाठी बोगदा, खाडीखालून 7 किमी लांब रेल्वे मार्ग; 2 तासांत प्रवास

गडचिरोलीमध्ये स्टीलचं उत्पादन वाढत असल्यामुळे या जिल्ह्यालाही इतर राज्यांशी जोडणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोलीला पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातील बंदरांना जोडण्यासाठी महामार्ग तयार केले जातील. त्यामुळे नागपूरही किनारपट्टीजवळ पोहोचणार आहे. त्यामुळे मुंबईतील पश्चिम किनारपट्टीवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा