Headlines

दोन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेल्या 25 वर्षीय जॉन टर्नरचा क्रिकेटला अलविदा! कठोर निर्णयामागचे कारण काय?


John Turner Retirement Reason :वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने क्रिकेटला रामराम केला आहे. त्याला काय समस्या येत होत्या. त्याच्या या निर्णयामागचे नेमके कारण काय? याचा सर्व तपशील आता समोर आला आहे.

John Turner Retirement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू साधारणपणे ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान निवृत्ती जाहीर करतात. मात्र, इंग्लंडच्या अवघ्या २५ वर्षीय वेगवान गोलंदाजाने अचानक व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याने असा निर्णय का घेतला आहे. याबद्दलचीही माहिती त्याने स्वतःच दिली आहे. पण या निर्णयानंतर हा खेळाडून क्रिकेट वर्तुळात चर्चेत आला आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे करिअर थांबलं

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नर याने प्रोफेशनल क्रिकेटला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये त्याने इंग्लंडकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तर २०२५ मध्ये तो शेवटचा मैदानावर दिसला. त्यानंतर त्याला पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत झाली आणि त्यातून तो पूर्णपणे सावरू शकला नाही.

टी-२० ब्लास्टमध्ये चमकदार कामगिरी

२०२१ मध्ये हॅम्पशायरशी करार केल्यानंतर टर्नरने सातत्याने खेळात प्रगती केली. २०२३ च्या टी-२० ब्लास्ट स्पर्धेत त्याने २१ विकेट्स घेतल्या होत्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंडच्या संघात स्थान मिळाले होते. त्याने इंग्लंडसाठी २ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले.

Maharashtra TimesShubman Gill IND vs SL : कॅप्टन बदलला, बॉलिंग आणि फिल्डिंगही फसली! लंकेविरुद्ध सरावात टीम इंडिया ढेपाळली, सकाळपासून काय घडलं?

मात्र, प्रत्येक पुनरागमनानंतर त्याला पुन्हा दुखापतीचा सामना करावा लागला. उपचार, पुनरागमन आणि फिटनेसवर भर देऊनही त्याची ही समस्या कायम राहिली. अखेर सततच्या दुखापतींना कंटाळून त्याने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

गोलंदाजांच्या दुखापती चर्चेत

असे असतानाच, टर्नरच्या निवृत्तीमुळे वेगवान गोलंदाजांमधील वाढत्या दुखापतींचाही मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भारताचा मयंक यादव, हर्षित राणा यांच्यासह अनेक युवा गोलंदाजांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता क्रिकेटमधील वाढता ताण, व्यस्त वेळापत्रक आणि फिटनेस व्यवस्थापन यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Maharashtra TimesIND W vs PAK W : भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! आशियाई क्रिकेट परिषदेने वेळापत्रक जाहीर केलं

टर्नरच्या निवृत्तीने इंग्लंड क्रिकेटलाही मोठा धक्का बसला आहे. भविष्यात राष्ट्रीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. मात्र, दुखापतींनी त्याचे स्वप्न अकाली संपवले. दरम्यान, त्याच्या निर्णयानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा