Aditya pancholi on zarina wahab and Dawood ibrahim relation:”बॉलिवूडमधील काही अभिनेते त्यांच्या सिनेमांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. यापैकी एक नाव म्हणजे सूरज पांचोली.

Raksha Bandhan:काही नाती रक्ताची, काही मनाची, प्रत्येक कथेत भाऊ-बहिणीच्या नात्याची ऊब, हे सिनेमे आज पाहाच
जरीना वहाब अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला राखी बांधते आणि म्हणूनच आदित्य इंडस्ट्रीत दादागिरी करतो,” अशा प्रकारच्या अफवांवर आदित्यनं तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत स्पष्टीकरण दिलं होत.रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर आणि बॉलिवूडमधील जुन्या वादांच्या चर्चांमध्ये आदित्य पांचोलीच्या या मुलाखतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
माझा बाप कोणी स्टार नाही…
मुलाखतीदरम्यान इंडस्ट्रीतील दुटप्पीपणावर बोट ठेवताना आदित्य पांचोली म्हणाला होता की, माझा बाप कोणी स्टार नाही, मी कोणत्याही स्टारचा मुलगा नाही; पण याचा अर्थ असा नाही की माझी स्वतःची काही ओळख नाही. जेव्हा दुसरं कोणी काही करतं तेव्हा त्याला ‘भोळा‘ म्हटलं जातं, पण जेव्हा तेच काम मी करतो तेव्हा थेट माझं नाव ‘दाऊद इब्राहिम’शी जोडलं जातं.
आपल्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर प्रश्न उपस्थित करत तो पुढे म्हणाला, माझ्यावर काय कोणता दंगलीचा खटला सुरू आहे का? मी कोणा निष्पाप प्राण्याची हत्या केली आहे का? कोणावरही कसलेही चुकीचे आरोप करणं खूप सोपं असतं.
जरीना वहाबवरील आरोपांवर संताप
पती-पत्नीचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या जाण्याच्या आरोपांवर बोलताना आदित्य अत्यंत भावूक आणि आक्रमक झाला. जरीना वहाबचा बचाव करताना तो म्हणाला.माझी पत्नी वयाच्या १७ व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. आजपर्यंत तिच्या चारित्र्यावर किंवा कामावर कोणीही बोट ठेवलेलं नाही. ती एक मुस्लीम स्त्री आहे म्हणूनच तिच्याबद्दल अशा अत्यंत नीच आणि बिनबुडाच्या अफवा पसरवल्या गेल्या की ती दाऊदला राखी बांधते. मी ठामपणे सांगतो की माझी पत्नी अत्यंत पवित्र आहे, ती माझ्यासाठी देवीसारखी आहे. तसंच जरीना वहाब, दाऊद इब्राहिमला राखी बांधते, असं म्हणतात, पण अरे मूर्खांनो, लिहिण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी विचार करा, एक मुसलमान, मुसलमानाला राखी बांधतो का? असंही सूरजनं म्हटलं.
Apurva Nemlekar Mangalgaur : अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर दणक्यात साजरी, भारतात नव्हे तर अमेरिकेत पारंपारिक उत्साहात रंगला खेळ
चुकीची कबुली, पण बिनबुडाच्या आरोपांना विरोध
आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चुकांबद्दल बोलतानाआदित्य पांचोलीने मान्य केलं की, “मी माझ्या आयुष्यात खूप चुका केल्या आहेत, पण प्रत्येक माणसाकडून चुका होतात. मी काही देव नाही, एक सामान्य माणूस आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोणीही उठून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ओसामा बिन लादेन किंवा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा खोटा ठपका ठेवेल.
आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आदित्य पांचोलीन या मुलाखतीद्वारे हे स्पष्ट केलं होतं की, बॉलिवूडमध्ये ‘आउटसाइडर’ असल्यामुळं आणि स्पष्टवक्तेपणामुळं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अनेकदा विनाकारण निशाणा बनवण्यात आलं.

