Headlines

Highest Debt to GDP Country; महासत्तेसमोर कर्जाची काटेरी वाट; भारतीय अर्थव्यवस्थेच्या 10 पट अमेरिकेवर कर्ज, तर सर्वात मोठा कर्जदार देश बरबाद

Highest Debt-to-GDP Ratio: अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील कर्ज पहिल्यांदाच 40 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे 3,350 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यापैकी शेवटचे एक ट्रिलियन पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत वाढले आहेत. अमेरिकेवरील कर्जाचा भार भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 10 पट जास्त आहे.

Countries with Highest Debt to GDP Ratio
US Economy Debt: वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांवरील कर्जाच्या रकमेत मोठी तफावत असल्याचे दिसून आली आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवरील कर्जाचा बोजा प्रचंड वेगाने वाढत असून अलीकडेच 40 ट्रिलियन डॉलर्स – अंदाजे 3,350 लाख कोटी रुपयांच्या – वर पोहोचले आहे. आश्चर्यकारक म्हणजे की अखेरचे 1 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत वाढले आहे.

जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक सरकारी कर्ज

जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक सरकारी कर्ज

जगातील छोट्या-मोठ्या देशांवरील कर्जाचा बोजा सतत वाढत आहे आणि अमेरिका व जपान याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. या देशांवरील सरकारी कर्ज सातत्याने वाढत असून लक्षणीय कर्ज असलेल्या विकसित देशांच्या यादीत कोण आघाडीवर आहे तर इतर देशांमधील परिस्थितीबाबत माहिती घेऊया.

जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश कोणता?

जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश कोणता?

दीर्घकाळापासून सुरू असलेला संघर्ष आणि गंभीर आर्थिक संकटामुळे सुदानचे कर्ज-जीडीपी गुणोत्तर जगात सर्वाधिक असून अंदाजे 252% ते 272 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

जपानवरील कर्जाचा बोजा

जपानवरील कर्जाचा बोजा

त्यानंतर जपानच्या अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा बोजा जीडीपीच्या दुप्पट, म्हणजेच 235% ते 237% पर्यंत आहे. जपानचा जीडीपी अंदाजे 4.38 ट्रिलियन डॉलर्स आणि त्यावर 1300 ट्रिलियन येन (अंदाजे 8.5 ते 9 ट्रिलियन डॉलर्स) पेक्षा जास्त कर्ज आहे. जपानमध्ये बहुतांश कर्ज देशांतर्गत Yen मध्ये ठेवले जाते, ज्यामुळे व्यवस्थापन करणे सोपे होते, तर सुदानसारख्या देशांमध्ये आर्थिक अस्थिरतेमुळे कर्जाचे प्रमाण खूप जास्त आहे.

सिंगापूरवरील कर्ज ते जीडीपी

सिंगापूरवरील कर्ज ते जीडीपी

आशियातील सर्वात श्रीमंत देशांपैकी सिंगापूरवर कर्जाचा बोजा जास्त आहे, पण या देशाचे कर्ज मॉडेल अद्वितीय आणि व्यवस्थापनीय आहे. सध्या, जपाननंतर सिंगापूरवर सर्वाधिक सरकारी कर्ज असून कर्ज जीडीपीच्या 171% ते 175% पर्यंत आहे.

व्हेनेझुएलावरील कर्जाचा भार

व्हेनेझुएलावरील कर्जाचा भार

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यापासून दक्षिण अमेरिकेतील हा देश गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जगात सर्वात मोठ्या तेलाचा साठा असलेल्या व्हेनेझुएलावर जीडीपीच्या सुमारे 164% – 308% कर्जाचा बोजा आहे, जी तीव्र अति-महागाई आणि आर्थिक संकटामुळे उपलब्ध आकडेवारीनुसार यात तफावत आढळते.

कोणत्या देशांवर सर्वात कमी कर्ज

कोणत्या देशांवर सर्वात कमी कर्ज

सर्वात कमी सरकारी कर्ज असलेल्या देशांच्या यादीत लिक्टेनस्टाईन, ब्रुनेई आणि कुवैत यांचा समावेश असून जीडीपीच्या एकूण 10 टक्केपर्यंत आहे. याशिवाय स्वित्झर्लंडवर जीडीपीच्या केवळ 15% कर्जाचा भर असल्याचा अंदाज असून रशियावरही कर्जाचा भार कमी आहे. तसेच एस्टोनिया, बल्गेरिया, तुर्की आणि सौदी अरेबिया यांचा क्रमांकही लक्षणीयरीत्या खाली आहे.

​अमेरिकेची कर्ज परिस्थिती समजून घ्या

​अमेरिकेची कर्ज परिस्थिती समजून घ्या

अमेरिकेच्या कर्जाचा सर्वात मोठा हिस्सा पेन्शन फंड, म्युच्युअल फंड, बँका, विमा कंपन्या, गुंतवणूक निधी यांसारख्या अमेरिकन संस्था आणि सामान्य अमेरिकन नागरिकांकडे आहे.एकूण 40 ट्रिलियन डॉलर्सपैकी अंदाजे 32.2 ट्रिलियन डॉलर्स ‘सार्वजनिक कर्ज’ म्हणजे जनता आणि गुंतवणूकदारांकडून घेतलेले असून अंदाजे 7.8 ट्रिलियन डॉलर्स सरकारच्या विविध विभागांकडे असलेला पैसा आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती कर्ज

भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती कर्ज

भारताच्या अर्थव्यवस्थेवरील कर्ज जीडीपीच्या सुमारे 81 टक्के ते 84 टक्केपर्यंत आहे, जे अनेक विकसित देशांच्या तुलनेत खूपच जास्त नियंत्रणात आहे.

अमेरिकेचा सर्वात मोठा कर्जदार कोण?

अमेरिकेचा सर्वात मोठा कर्जदार कोण?

परदेशी सरकारे आणि गुंतवणूकदार देखील सुरक्षित गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर यूएस ट्रेझरी सिक्युरिटीज खरेदी करतात, ज्यामध्ये खालील देश आघाडीवर आहे. अमेरिकेचा सर्वात मोठा परदेशी कर्जदाता जपानने अंदाजे $1.12 ट्रिलियन कर्ज दिले असून ब्रिटनने अंदाजे $940 अब्ज कर्जासह दुसऱ्या आहे. तसेच एकेकाळी सर्वात मोठा कर्जदार असलेला चीन आता राखीव निधी वापरत असला तरी $633 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. याशिवाय भारताचीही अमेरिकेत लक्षणीय गुंतवणूक केली असून भारताने अमेरिकेला अंदाजे $200 अब्ज डॉलर्सचे (ट्रेझरी बॉण्ड्सच्या स्वरूपात) कर्ज दिले आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा