Headlines

दस्तनोंदणीस नकार दिल्याने सहदुय्यम निबंधकाला मारहाण:आंबेगाव कार्यालयात घडला प्रकार, वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा




आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दस्तनोंदणीस नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र कोळी यांनी या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कोळी हे वरिष्ठ लिपिक असून, गेल्या महिन्याभरापासून ते आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी सहदुय्यम निबंधक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी वकील, त्याचा भाऊ आणि आणखी एक व्यक्ती दस्तनोंदणीसाठी कार्यालयात आले होते. दस्तनोंदणीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे जोडलेली नसल्याचे कोळी यांच्या निदर्शनास आले. कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे दस्तनोंदणी करता येणार नाही, असे त्यांनी तिघांना स्पष्ट केले. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपी वकिलासह त्याच्या साथीदारांनी कोळी यांना बांबूने मारहाण केली. या मारहाणीत कोळी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ४६ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी समाज माध्यमात एक जाहिरात प्रसारित केली होती. आभासी चलन, परदेशी चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सपना देवताळे तपास करत आहेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत