Priyanka Chopra on Sridevi Biography:बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज जन्मदिवस. या निमित्तानं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं एक पोस्ट शेअर केली आहे.

श्रीदेवी यांच्या चरित्र पुस्तकाची पहिली झलक
प्रियांका चोप्रानं तिच्या पोस्टमध्ये श्रीदेवी यांच्या चरित्र पुस्तकाची पहिली झलक शेअर केली आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ तिनं शेअर केलं आहे.
ऑटोबायोग्राफीचं मुखपृष्ठ आणि प्रियंकाची भावुक पोस्ट
प्रियंका चोप्रानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रीदेवी यांच्या अधिकृत बायोग्राफीचे मुखपृष्ठ शेअर केलं. ‘Empress – The Definitive Biography of Sridevi’ (एम्प्रेस) असं या पुस्तकाचे शीर्षक असून लेखक धिरज यू. कुमार यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर महानायक अमिताभ बच्चन यांची एक खास ओळ देखील छापण्यात आली आहे. “The epitome of unmitigated talent” (अथांग आणि अजोड प्रतिभेचे मूर्तिमंत रूप).
हे मुखपृष्ठ शेअर करताना प्रियंकानं लिहिलं की,एक आणि एकमेव… तुमची खूप आठवण येते. तुम्ही जिथं असाल तिथं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियांकाना श्रीदेवींचे पती बोनी कपूर, त्यांच्या मुली जान्हवी आणि खूशी कपूर यांनाही या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. प्रियंकाच्या या पोस्टनंतर श्रीदेवी यांचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनीही ही स्टोरी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर री-शेअर करत आभार मानले.
Batwara 1947 vs Awarapan 2: ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत इम्रान हाश्मीने सनी देओलला टाकलं मागे, ‘आवारापन २’च्या इतक्या तिकीटांची विक्री
चित्रपटांमधील अविस्मरणीय योगदान
‘मिस्टर इंडिया’, ‘चांदणी’, ‘चालबाझ’, ‘सदमा’ आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत अकाली निधन झालं होतं. वेस्टलँड बुक्सद्वारे प्रकाशित होणारं हे पुस्तक त्यांच्या बालकलाकार म्हणून सुरू झालेल्या प्रवासापासून ते सिनेसृष्टीतील सुवर्णकाळापर्यंतच्या आठवणींना उजाळा देईल.
Sanjay Jadhav On Daughter Boyfriend : तिच्या बॉयफ्रेण्ड्ससोबत मी तोंडावर चांगला वागतो, पण मला ते अजिबातच आवडत नाहीत, लेकीच्या अफेअर्सवर स्पष्टच बोलले संजय जाधव
प्रियांकाच्या कमबॅकबद्दल उत्सुकता
तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक ओळख निर्माण करणारी ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा जोनास सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळं प्रचंड चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक बड्या हॉलिवूड चित्रपटांसोबतच भारतीय सिनेमांमध्ये तिचं होणारं कमबॅक यामुळं तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ या बिग बजेट ॲक्शन चित्रपटात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या पार्श्वभूमीवर प्रियंकाची हैदराबाद इथं तिनं लावलेली हजेरी चांगलीच चर्चेत राहिली होती.

