Headlines

तीन रिअॅलिटी शो , पण खरी परीक्षा स्पर्धा संपल्यानंतर, ‘इंडियन आयडॉल’ फेम गायिकेनं सांगितलं वास्तव


Anshika Chonkar talks about journey :’इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोचं सध्या १६ वं पर्व सुरू आहे. या सीझनमध्ये अंशिका चोणकर ही मराठमोळी स्पर्धक सहभागी झाली आहे.

indian idol season 16 contestant anshika chonkar talks about journey
दिपश्री आपटे
‘ इंडियन आयडॉल ‘ या लोकप्रिय कार्यक्रमात एकापेक्षा एक सुमधुर गायक आपल्या गायकीनं रसिकश्रोत्यांची मनं जिंकून घेत आहे. त्यात मराठमोळी अंशिका चोणकर हीसुद्धा तिच्या प्रत्येक सादरीकरणानं परीक्षकांसह प्रेक्षकांनाही थक्क करते. आजवर अंशिका वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. पण रिअॅलिटी शोमधून मिळालेलं यश ही केवळ सुरुवात असते, खरी परीक्षा त्यानंतर सुरू होते, असं मत तिनं ‘मुंटा’शी बोलताना व्यक्त केलं.

‘इंडियन आयडॉल’च्या सोळाव्या सीझनमध्ये अंशिका अंतिम आठ स्पर्धकांमध्ये टिकून आहे. या कार्यक्रमानं दिलेली नवी ओळख, प्रेक्षकांचं प्रेम आणि पुढील वाटचालीबाबत तिनं भावना मांडल्या. “इंडियन आयडॉल’ शोमध्ये मला अनेक चांगल्या संधी मिळाल्या. मुख्य म्हणजे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं. आतापर्यंत लक्षात राहिलेली आठवण म्हणजे सुरुवातीला माझं एक सादरीकरण परीक्षकांना इतकं आवडलं होतं, की कार्यक्रमाचे नियम मोडून चौथा प्लॅटिनम माइक देण्यात त्यामुळे दरवेळी उत्तमच सादरीकरण करायचं, या जबाबदारीनंच मी मंचावर उभी राहते’, असं अंशिका म्हणाली.

रिअॅलिटी शो संपल्यानंतर संघर्ष सुरू होतो, असं मत मांडत स्पर्धेपेक्षा लाइव्ह शो आणि कॉन्सर्ट्स अधिक महत्त्वाच्या असल्याचं अंशिकानं सांगितलं. ‘स्पर्धा संपल्यानंतर स्वतःचा दर्जा कायम ठेवावा लागतो. प्रेक्षकांसमोर थेट सादरीकरण करण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे भविष्यात मी प्रत्यक्ष कार्यक्रम करण्यावर अधिक भर देणार आहे’, असं ती म्हणाली. रिअॅलिटी शोमधील स्पर्धा आणि त्यात टिकून राहण्याचं महत्त्व याविषयी तिनं सांगितलं, ‘कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर प्रेक्षकांसमोर सातत्यानं येत राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे नवोदित कलाकारांसाठी रिअॅलिटी शो खूप महत्त्वाचा ठरतो.’
Maharashtra TimesKunal Kamra: पक्षाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी मला पोकळ धमक्या, पण मी घाबरणार नाही; कुणाल कामराने मनीषा कायंदे यांना सुनावलं

अंशिकाचा हा तिसरा रिअॅलिटी शो आहे. लहानपणी एका कार्यक्रमात तिनं सहभाग घेतला होता. त्यानंतर ‘सारेगमप’ मध्ये ती दिसली होती. पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर ती ‘इंडियन आयडॉल’ मध्ये सहभागी झाली. याबद्दल ती सांगते, ‘मी या शोमध्ये येण्यापूर्वी खूप निराश झाले होते. हा माझा शेवटचा रिअॅलिटी शो असेल, असं ठरवूनच मी तिथे गेले होते. पण हा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ठरला. या शोमध्ये मिळालेल्या संधीमुळे करिअरला नवीन दिशा मिळाली.’
Maharashtra TimesMugdha Shah : बालपणी सावत्र आईकडून झालेला छळ, घरातून पळून गेली, विरार फास्टमधून उडी; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ
‘मटा’सोबतचं नातं खास
‘माझ्या आई-वडिलांमुळे लहानपणापासून ‘महाराष्ट्र टाइम्स’ वाचायची सवय होती. दोन वर्षांपूर्वी ‘मटा कार्निव्हल’च्या उद्घाटन सोहळ्यात मला गाण्याची संधी मिळाली, तेव्हा प्रचंड आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशी कार्निव्हलचा वृतांत वर्तमानपत्रात छापून आला होता. त्यात माझाही फोटो होता. मी वाचत आले, त्यात माझा फोटो येणं, हा क्षण माझ्यासाठी खास होता. त्यामुळे लहानपणापासूनच ‘मटा’शी खास नातं आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा