Headlines

तिने पेरू पाण्यात टाकला अन् किळसवाण्या किडी बाहेर आल्या; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क! ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा – how to remove worms from guava fruit step by step cleaning guide


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पेरू पाण्यात टाकल्यानंतर किड्यासारखे जीव बाहेर येताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून पेरू खाण्यापूर्वी तो स्वच्छ कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

How to Remove Pesticide Residues from Fruits,
फोटो सौजन्य :- @istock, @aasanhai008
सोशल मीडियावर सध्या फळे आणि भाज्या स्वच्छ करण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये पेरू पाण्यात टाकल्यानंतर त्यातून किड्यासारखे जीव बाहेर येताना दिसत आहेत. aasanhai008 या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात पेरू खाण्यापूर्वी तो नेमका कसा स्वच्छ करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, पेरू पाण्यात भिजवल्यानंतर किडे बाहेर आले म्हणजे प्रत्येक पेरूमध्ये अशाच प्रकारे किडे असतात, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. तसेच केवळ पाण्यात पेरू काही वेळ बुडवून ठेवणे हे फळ पूर्णपणे सुरक्षित करण्याची खात्रीशीर पद्धत नाही. पेरू स्वच्छ करण्यासाठी वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुणे आणि हाताने चोळणे अधिक महत्त्वाचे आहे. याबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने फळे आणि भाज्या धुण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :- @istock, @aasanhai008)

पेरू फक्त पाण्यात बुडवून ठेवणे पुरेसे आहे का?

पेरू फक्त पाण्यात बुडवून ठेवणे पुरेसे आहे का?

पेरू स्वच्छ करण्यासाठी केवळ एका भांड्यात पाणी घेऊन त्यात फळ बुडवून ठेवण्यापेक्षा वाहत्या स्वच्छ पाण्याखाली ते धुणे अधिक योग्य आहे. FSSAIच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, स्वच्छ वाहत्या पाण्याने फळे आणि भाज्या धुतल्याने त्यांच्या पृष्ठभागावरील कीटकनाशक कमी होण्यास मदत होते. FSSAIच्या मार्गदर्शक माहितीनुसार, पाण्याने धुतल्यावर पृष्ठभागावरील सुमारे 75 ते 80 टक्के pesticide residues कमी होऊ शकतात. मात्र हा आकडा प्रत्येक फळ आणि प्रत्येक कीटकनाशकासाठी सारखा असेलच असे नाही.

भारतीय संशोधनात पेरू धुतल्यावर काय आढळले?

भारतीय संशोधनात पेरू धुतल्यावर काय आढळले?

पेरू धुण्याचा कीटकनाशक वर नेमका काय परिणाम होतो, यासाठी भारतातील Indian Journal of Horticulture मध्ये प्रकाशित झालेला अभ्यास महत्त्वाचा आहे.या अभ्यासात dimethoate, lambda-cyhalothrin आणि malathion या तीन कीटकनाशकांच्या पेरूवरील अवशेषांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी पेरूच्या नमुन्यांमधील residues तपासल्यानंतर धुण्यामुळे त्यात लक्षणीय घट झाल्याचे आढळले.

पेरू स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

२-३ वेळा धुण्याचा सल्ला का दिला जातो?

२-३ वेळा धुण्याचा सल्ला का दिला जातो?

पेरू आणि इतर फळांवरील कीटकनाशक कमी करण्यासाठी भारताच्या National Institute of Plant Health Management (NIPHM) कडून उपलब्ध मार्गदर्शनात धुण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे. पेरूसारख्या फळांसाठी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, 2-3 वेळा धुतल्याने पेरूवरील सर्व pesticide residues किंवा किडे पूर्णपणे निघून जातील, असा अर्थ या मार्गदर्शनातून काढू नये. धुण्याचा उद्देश पृष्ठभागावरील दूषित घटक आणि काही कीटकनाशक कमी करणे हा आहे.

मीठाच्या पाण्यात पेरू भिजवावा का?

मीठाच्या पाण्यात पेरू भिजवावा का?

फळे आणि भाज्यांवरील काही खतं कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र घरच्या घरी पेरू बराच वेळ मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवणे ही प्रत्येक प्रकारच्या pesticide किंवा कीटकांसाठी हमखास उपाययोजना आहे, असे वैज्ञानिकदृष्ट्या म्हणता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक घरगुती उपायाची तंतोतंत नक्कल करण्यापेक्षा स्वच्छ वाहत्या पाण्याने पेरू व्यवस्थित धुणे हा सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.

पेरूमध्ये किड आहे हे कसं ओळखाल

पेरूमध्ये किड आहे हे कसं ओळखाल

पेरू खरेदी करतानाच त्याची नीट तपासणी करा. फळावर छिद्र दिसत असल्यास, काही भाग असामान्यपणे मऊ असल्यास किंवा कुजल्यासारखा वास येत असल्यास असे फळ घेणे टाळा.पेरू घरी आणल्यानंतरही तो कापण्यापूर्वी तपासा. कापल्यानंतर आतून अळी, कुजलेला भाग किंवा असामान्य बदल दिसल्यास तो भाग खाऊ नका.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा