![]()
तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवणारी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) आता सायबर गुन्हेगारांचे अत्यंत घातक हत्यार बनली आहे. डार्क वेबवर ‘क्राइम जीपीटी’सारखी बेकायदेशीर साधने अत्यंत कमी दरात सहज उपलब्ध आहेत. यामुळे तांत्रिक ज्ञान नसलेली कोणतीही व्यक्ती आता सहजपणे क्लिष्ट सायबर हल्ले करू लागली आहे. बनावट ई-मेल किंवा आवाजाची नक्कल करणे एआयमुळे काही सेकंदांत शक्य झाले आहे. सामान्य लोक अशा बनावट लिंक्सवर नेहमीपेक्षा चार पट अधिक वेगाने क्लिक करत असल्याने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ४२९ सोशल मीडिया हँडल्सवर कारवाईः या संकटाची भीषणता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होते. राजकीय नेते आणि व्हीआयपी व्यक्तींचे बनावट व्हिडिओ पसरवणाऱ्या ४२९ सोशल मीडिया खात्यांवर कारवाई केली असून १४० पेक्षा जास्त एआय-डीपफेक प्रोफाइल्स हटवले. फसवणुकीची ही आहेत हत्यारे व्हॉइस क्लोनिंग : ३ ते ५ सेकंदांचे व्हॉइस सॅम्पल वापरून कोणाचाही हुबेहूब आवाज तयार करता येतो.
डीपफेक आणि इमेज जनरेटर : केप्रॉम्प्ट देऊन कोणत्याही व्यक्तीचा बनावट आणि अश्लील फोटो तयार केला जातो.
फेस स्वॅप : इंटरनेटवरील मोफत साधनांद्वारे एका व्यक्तीचा चेहरा दुसऱ्याच्या शरीरावर लावून बनावट व्हिडिओ बनवतात. एक्स्पर्ट व्ह्यू एआयमुळे गुन्हेगाराला कोडिंग शिकण्याची गरज उरलेली नाही. अँटिव्हायरससारखी पारंपरिक साधने या हल्ल्यांना रोखण्यासाठी आता सक्षम नाहीत. सुरक्षा यंत्रणेतही प्रगत स्वयंचलित एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे आता अधिक आवश्यक झाले आहे. अॅड. महेंद्र लिमये, सायबर सुरक्षा सल्लागार
Source link
डार्क वेबवरील ‘क्राइम जीपीटी’ ठरतेय गुन्हेगारांचे नवे हत्यार:काही रुपयांमध्ये एआय टूल्स उपलब्ध; नागरिकांच्या सुरक्षेला धोका
