Headlines

1 lakh soldiers oppress 45 lakh citizens in PoK, yet there is strong opposition, Pakistan rules with the power of the army


  • Marathi News
  • International
  • 1 Lakh Soldiers Oppress 45 Lakh Citizens In PoK, Yet There Is Strong Opposition, Pakistan Rules With The Power Of The Army

सिकंदर सुरी2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या ताब्यातील पीओके… पाकिस्तानने लष्कराच्या बळावर येथे कब्जा केला आहे. या अत्याचाराविरोधात सुमारे दोन महिन्यांपासून लोक रस्त्यावर आहेत. बंदुकीच्या छायेत भीतीने जगणारे लोक आता बोलू लागले आहेत. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या पीओकेमधील परिस्थितीचा आढावा घेणारा दिव्य मराठीचा ग्राउंड रिपोर्ट.

पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरची (पीओके) परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. डोंगर, नद्या आणि वळणदार रस्ते सर्व तेच आहेत. मात्र, आठवड्यांपासून सुरू असलेली निदर्शने, गोळीबार आणि लष्कराच्या तैनातीमुळे हवेत बारूदचा दर्प मिसळला आहे. इस्लामाबादहून पीओकेचा प्रवास एक वेगळाच अनुभव देतो. जसजसा पीओके जवळ येतो तसतशी तपासणी नाक्यांची संख्या वाढत जाते. कारचा वेग कमी होतो. गणवेशधारी सैनिक रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसतात. प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जाते. जे प्रश्न कधीकाळी सामान्य वाटायचे ते विचारण्याची पद्धत आता बदलली आहे.

एक सैनिक कठोर आवाजात जवळजवळ धमकावत विचारतो- कुठे जात आहात? का जात आहात? कुठे थांबणार? कोणाला भेटायचे आहे? अलीकडील हिंसाचारानंतर येथे पोहोचणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पीओके हे पर्यटन स्थळ नसून लष्करी पिंजऱ्यासारखे वाटते. जमिनीवर हा संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो. चकमकींचा उल्लेख येताच लोक आता पाक सरकारच्या विरोधात बोलू लागले आहेत. लोक हा लष्करी पिंजरा तोडण्यासाठी उभे राहिले आहेत. ते मागे हटणार नाहीत.

आंदोलन करणाऱ्या जॉइंट ॲक्शन कमिटीच्या ३८ मागण्या आहेत. यामध्ये लोकांसाठी स्वस्त पीठ ही मुख्य मागणी आहे. पीओकेमधील लोकसंख्येचा मोठा भाग स्वस्त पिठासाठी पाकिस्तान सरकारवर अवलंबून आहे. समितीला निर्वासितांच्या १२ जागा रद्द करायच्या आहेत. याच जागांच्या बळावर पाक सरकार पीओकेवर राज्य करते. त्याच्या सत्तेवर मोठा परिणाम होतो.

परिस्थिती : डॉक्टर नाहीत, रस्ते खराब, शाळा दूर

मुझफ्फराबादमधील वजाहत (३०) याच्या मते, पीओकेमध्ये पायाभूत सुविधा नावाचा प्रकारच नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर नाहीत. कंपाउंडरच्या भरवशावर मलमपट्टी केली जाते. उपचारासाठी इस्लामाबादला जावे लागते. रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची दुरुस्ती केली जात नाही.

दहशत : रात्री दरवाजावर पडणारी थाप आम्हाला झोपू देत नाही

मीरपूरमधील ४० वर्षीय चांद बीबी सांगतात की, १५ दिवसांपूर्वी रात्री सैनिकांनी घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच चार सैनिक आत घुसले. त्यांनी माझा १६ वर्षांचा मुलगा अख्तर याला उचलून नेले. ते म्हणाले- हा खूप घोषणाबाजी करतो. आमच्या विनवण्या लाथाडून त्याला घेऊन गेले. तीन दिवसांनंतर अख्तर घरी परतला. त्याच्या अंगावर वळ उठले होते. त्याला खूप यातना देण्यात आल्या होत्या.

वेदना : मुलाला लष्कराने मारले, नंतर अंत्ययात्रेवरही गोळीबार केला

मुझफ्फराबादमधील ५५ वर्षीय महमूद मुसाफिर यांचा २२ वर्षीय मुलगा इंतखाबला लष्कराने १५ जुलै रोजी गोळ्या घालून ठार केले. महमूद सांगतात की, हक्कासाठी रस्त्यावर उतरणे हाच माझ्या मुलाचा दोष होता. दुसऱ्या दिवशी इंतखाबच्या अंत्ययात्रेत काही संतप्त तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हा लष्कराने गोळीबार केला. यात काही तरुण जखमी झाले. माझ्या मुलाला नीट दफनही करता आले नाही. लष्कराला आमचे तळतळाट लागतील.

पाकिस्तान पोखरतोय

पीओकेमध्ये ४ जूनपासून आंदोलनाची सुरुवात रावलाकोटला झाली. ९ जून रोजी मुझफ्फराबादमधील आंदोलनाची ठिणगी धुमसतेय. लष्कराच्या गोळीबारात ८९ जणांचा मृत्यू झाला. २ महिन्यांपासून इंटरनेट बंद करून शाहबाज शरीफ सरकार केवळ १२ लोकांचा मृत्यू झाल्याचे मान्य करत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत