Headlines

ठाणे ते ऐरोली सहा पदरी खाडीपूल बांधणार, प्रवासात 30 मिनिटं वाचणार; MMRDAचा नवा प्लॅन काय?| Maharashtra Times


Thane Creek Bridge: ठाणे ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी लवकरच एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. ठाणे-ऐरोली सहा पदरी केबल-स्टेड खाडीपुलासाठी एमएमआरडीने निविदा काढल्या आहेत.

ठाणे- ऐरोली खाडीपूल
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: ठाण्यावरून नवी मुंबईपर्यंत प्रवास करताना प्रवासी दररोज कळवा आणि मुलुंड-ऐरोली खाडीपुलावर वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर वेळ वाया जातो. लोकल प्रवासाचं चित्रकही काही वेगळं नाही. ठाण्यावरून ट्रान्स-हार्बर मार्गासाठी लोकल बदलून प्रवास करावा लागतो. त्यात नेहमीचा विलंब आणि वाढत्या गर्दीमुळे नागरिकांचे हाल होतात. ठाणे-ऐरोली पुलामुळे ही वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

कुठून-कसा असेल मार्ग?

MMRDA ठाणे पूर्वेतील कोपरीपासून ऐरोली येथील पटणीपर्यंत पूल बांधणार आहेत. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने 723.42 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या प्रकल्पामध्ये ठाण्याच्या खाडीवर 1.4 किलोमीटर लांब सहा पदरी पूल बांधण्यात येईल. ठाणे रेल्वे स्थानकापासून अगदी 750 मीटर अंतरावर असलेल्या कोपरी येथील मिठ बंदर मार्गापासून ऐरोली येथील नॉलेज सिटी मार्गापर्यंत पूल असेल. ठाणे रेल्वे स्थानकापासून ते ठाणे-बेलापूर मार्गापर्यंत थेट दुवा निर्माण होणार आहे.

Maharashtra TimesDombivli Jetty: डोंबिवलीकरांना मिळणार दोन नवे जलमार्ग, जेट्टीचं 70 टक्के काम पूर्ण; नवी मुंबई, वसईपर्यंत थेट प्रवास

प्रकल्पाचं काम सुरू होताच पुढीस 42 महिन्यांमध्ये हा मार्ग सुरू करण्याचं एमएमआरडीएचं उद्दिष्ट आहे. जर वेळेवर काम पूर्ण झालं तर 2030पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईदरम्यान एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. ठाणे पूर्व ते ऐरोली-दिघापर्यंत प्रवासत 20 ते 30 मिनिटे वेळ वाचण्याची शक्यता आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड सुरू झाल्यावर पश्चिम उपनगरातील वाहतूकही नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येईल. यावेळी वाढती वाहतूक हाताळण्यासाठी हा नवा मार्ग फायदेशीर ठरणार आहे.

ताशी 1,900 वाहनं हाताळण्याची क्षमता

ठाणे-बेलापूर मार्गापासून जेएनपीटी आणि नाशिक महामार्गापर्यंत जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. सध्या ऐरोली आणि मुलुंड खाडीपुलावर वाहतूककोंडी वाढत चालली आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या एका पर्यायी मार्गाची गरज आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार ठाणे-बेलापूर मार्गावरून दररोज 51,000 वाहनं वाहतूक करतात. यापैकी 30,000 वाहनं ऐरोली-मुंलुंड खाडीपुलावरून प्रवास करतात. या नवीन पुलावर ताशी 1,900 वाहनं हाताळण्याची क्षमता असेल. त्यामुळे ऐरोली-मुलुंड पुलावरील वाहनांची वाहतूक विभागली जाईल.

Maharashtra TimesKhandesh Expressway: जळगाव ते संभाजीनगर एका तासात, मुंबई पाच तासांत, ‘खान्देश एक्सप्रेवे’मुळे फायदा होणार; कोणत्या गावांचा समावेश?

ठाणे ते नवी मुंबईदरम्यान मालवाहतुकीसह प्रवाशांनाही मोठा फायदा होईल. जेएनपीटी आणि नाशिक महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार असून नवी मुंबई विमानतळापर्यंत कनेक्टीव्हीटी वाढणार आहे. तसेच, मुंबई महानगर प्रदेशात पूर्व-पश्चिम कनेक्टीव्हीटीही सुधारेल. भविष्यात या मार्गाला ठाणे कोस्टल रोड आणि सिडकोच्या विमानतळाला जोडणाऱ्या नव्या उन्नत मार्गाला ही जोडण्यात येणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा