Headlines

Gondia School Accident: शाळेचा गेट कोसळून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू, मुख्याध्यापिकेचीच मुलगी दगावली, गोंदियात हळहळ – gondia tiroda nagar parishad school accident class 5th student dies after iron gate collapse on her


Gondia School Gate Collapse News: शाळेचं लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने मुख्याध्यापिकेच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

gondia news
शाळेचे गेट कोसळून मुख्याध्यापिकेच्या मुलीचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा, गोंदिया: शाळेचे लोखंडी गेट अचानक कोसळल्याने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तिरोडा नगरपरिषदेच्या लोधीटोला भागातील पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेत घडली. निराली मनीष चाफले (वय ११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. निरालीची आई याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

नेमकं काय घडलं?
तिरोडा नगरपरिषद संचालित लोधीटोला येथील पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेचे मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. गेटच्या दुरूस्तीचा प्रस्ताव दिला होता. विद्यार्थ्यांना त्या गेटपासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडत असताना अचानक गेट कोसळले. या दुर्घटनेत निराली गेटखाली दबून गंभीर जखमी झाली. तिला तातडीने तिरोडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी तिला गोंदिया येथे नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात कोचिंग क्लासमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार, शिक्षणाच्या माहेरघरात खळबळ
प्रज्ञाशोध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
निराली ही हुशार विद्यार्थिनी होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात चौथा क्रमांक मिळवला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा पुणे येथे सन्मानही करण्यात आला होता. निरालीची आई शुभांगी चौधरी-चाफले या याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Maharashtra TimesSatara Crime : वरच्या सिग्नलची वायर कट, खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून Sahyadri Expressला थांबवलं; साताऱ्यात रेल्वे प्रवाशांना लूटलं
परिसरात शोककळा
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ही घटना शाळांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा