Headlines

झिम्बाब्वेविरूद्ध फेल ठरल्याने अभिषेक खचला, पोस्ट करत व्यक्त झाला; सूर्या दादा धावून आला, म्हणाला…


Suryakuamar yadav on Abhishk Sharma News : भारताचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा याने एक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये दिसत आहे की तो खूप दु:खी झाला आहे. सूर्याने हे पाहिल्यावर त्यावर एक झकास कमेंट करत त्याचे मनोबल वाढवले आहे.

Suryakuamra Yadav Abhishek Sharma
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वैभव सूर्यवंशीचे आक्रमक अर्धशतक तसेच मयंक यादव याच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी लिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर ३५ धावांनी मात केली. यासह भारताने तीन सामन्यांची मालिकेत ३०० असे अपेक्षित यश संपादन केले. या संपूर्ण मालिकेमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा अपयशी ठरला. समोरील गोलंदाजाचा कसलाही विचार न करणाऱ्या अभिषेकला तीन सामन्यात फक्त ११ धावा करता आल्या. यामुळे तो स्वत:च नाराज झालाय, त्याने एक पोस्ट केली होती. अशातच य पोस्टवर भारतीय संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने कमेंट केली आहे. सूर्या काय म्हणाला जाणून घ्या.

अभिषेक शर्मा याने केलेली पोस्ट

जेव्हा तुम्ही ते देऊ शकत नाही ज्याची अनेकांना तुमच्याकडून आशा असते. त्यावेळी दु:ख होतं. पण हा खेळ असा आहे की जो चांगलं प्रदर्शन करतो त्यालाबक्षीस देतो. टीम जिंकली याचा आनंद आहेस, जोरदार कमबॅक करणार, असं अभिषेक शर्मा म्हणाला. अभिषेक अपयशी ठरल्याने तो नाराज असल्याचं दिसून आलं. हे पाहून सूर्या दादाने एक कमेंट केली आहे.
Maharashtra TimesCommonwealth Games 2026 : दीडशे रुपये रोजंदारी, ते राष्ट्रकुल रौप्य… सायकलवरून रोजचा 40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ऋषिकांत सिंगची संघर्षगाथा

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

तू सलग दोन वर्ष आनंदी होण्याची अनेक कारणे दिली आहेत. ज्यावेळी भारताला सर्वात जास्त गरज होती त्यावेळी तू देशाचा गौरव वाढवला आहे. वेळेची गोष्ट असते, जसा आहेस तसा राहा, असं सूर्यकुमार यादवने म्हटलं आहे. या पोस्टमुळे अनेकांनी सूर्याचे कौतुक केले आहे. संघात नसतानाही त्याने अभिषेकचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra TimesMirabai Chanu Life Story : लाकडाच्या मोळ्या उचलताना किक बसली, गावातली मुलगी वेटलिफ्टर बनली, भारताची गोल्डन गर्ल मीराबाई चानूचा संघर्षमय प्रवास

तिसऱ्या टी-20 सामन्याचा आढावा

हरारे स्पोर्ट्स क्लबवर पार पडलेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद १९२ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ७ बाद १५७धावाच करता आल्या, भारतीय गोलंदाजांना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ बाद करण्यात अपयश आले. त्यात भारतीय गोलंदाजांनी दिलेल्या २० अवांतर धावा नक्कीच चिंतेचा विषय ठरू शकतो. यात १३ वाइडचा समावेश होता.