Headlines

TATA Consumer Products Price Hike; TATA चा झटका! सणासुदीत महिन्याचे बजेट कोलमडणार; चहापासून मिठापर्यंत रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किमती वाढणार


Tata Products: सर्वसामान्यांच्या खिशावरील महागाईचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता असून चहा आणि डाळींसारख्या दैनंदिन जीवनावश्यक गोंष्टींच्या किमती वाढण्याचा धोका सध्या अनेकांसमोर उभा आहे. होय, दररोजच्या वापराच्या गोष्टींच्या खरेदीवर सर्वसामान्यांना आता आणखी खिसा रिकामा करावा लागू शकतो. आंतरराष्ट्रीय तणाव आणि प्रतिकूल हवामान या कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमती सतत बदलत असून किमतीत अस्थिरता कायम राहिल्यास निवडक उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे टाटा प्रोडक्ट्सनी संकेत दिले आहेत.

टाटांचा चहापासून मीठापर्यंत सगळं महागणार

टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सनी गेल्या तिमाहीत अन्न आणि पेय पदार्थांच्या दमदार विक्रीच्या जोरावर चांगला नफा नोंदवला, जो ग्रामीण भारतातील वाढत्या मागणीचे द्योतक आहे. पण यादरम्यान, वाढत्या वस्तूंच्या किमती आणि पॅकेजिंगचा खर्च नफ्याच्या प्रमाणावर दबाव पडत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले ज्यामुळे दरवाढ करणे भाग पडत आहे.

Maharashtra TimesGold Silver Rate Today: पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा परिणाम; सोने-चांदीची स्वस्ताई ओसरली, अमेरिका-इराण युद्ध थांबताच दर पुन्हा वाढले
टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गरज पडल्यास आम्ही दरवाढ करण्याचाही विचार करत आहोत. मध्यपूर्वेतील परिस्थितीत चिघळत आहे, ज्यामुळे खर्च वाढत आहे. या काळात अनेक भारतीय कंपन्या नफा टिकवण्यासाठी उत्पादनांच्या किमती वाढवत असून अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे व्यापारी मार्ग विस्कळीत झाले आणि जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, त्यामुळे उत्पादनांच्या पॅकचा आकार कमी किंवा छोटा होत आहे आणि खर्चही कमी करत आहेत. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्यामुळे महागाईच्या वाढत्या धोक्यावर दुर्लक्ष करणे शक्य नाही.

टाटा कन्झ्युमरची तिमाही कामगिरी

30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा कन्झ्युमरचा एकूण निव्वळ नफा 28% वाढून 4,027 कोटी रुपयांवर पोहोचला तर विश्लेषकांना 4,200 कोटींचा नफा अपेक्षित होता. टाटा टी, टेटली, ऑरगॅनिक इंडिया आणि चिंग्ज सिक्रेट यांसारख्या ब्रँड्सच्या किमतीत वाढ करण्याबद्दल कंपनी सकारात्मक असल्याचे तिमाही निकालानंतर समोर आले.

Maharashtra TimesUS Economic Crisis: ट्रम्पची अमेरिका अनागोंदींच्या वाटेनं! GDP वर 3250 लाख कोटींचे कर्ज, भारतासह सर्व गुंतवणूकदारांना कियोसाकींनी सांगितला उपाय
त्याचवेळी, कंपनीचा एकूण महसूल 13% वाढला, तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात 17% वाढ झाली असून या काळातील एकूण महसूल 12% वाढून 5349 कोटी रुपये झाला.

याशिवाय, टाटा कन्झ्युमरने भारतातील मीठ आणि कॉफी व्यवसायात अनुक्रमे 7% आणि 24% वाढ नोंदवली. टाटा कंझ्युमर Starbucks नावाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरात कॉफीचा व्यवसाय वाढवत असून वार्षिक 50 ते 70 बेसिस पॉइंट्सने ऑपरेटिंग मार्जिन वाढेल आणि महसूल दुहेरी अंकात वाढेल.

दुसरीकडे, गेल्या आठवड्यात पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी (27 जुलै) टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कमाई आणि ब्रोकरेज कंपन्यांनी कंपनीच्या वाढीच्या दृष्टिकोनाबाबत सकारात्मकता दर्शवल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला व सोमवारी सकाळच्या सत्रात टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअर्समध्ये जवळपास 3% वाढून निफ्टी50 मधील टॉप गेनरपैकी बनला.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत