कौतुकास्पद! आदिवासी विद्यार्थ्यांची NEET मध्ये गरुडझेप; दुर्गम भागातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार – gadchiroli tribal students achieve great success in neet exam dream of becoming doctor from remote area comes true
कौतुकास्पद! आदिवासी विद्यार्थ्यांची NEET मध्ये गरुडझेप; दुर्गम भागातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार – gadchiroli tribal students achieve great success in neet exam dream of becoming doctor from remote area comes true
परिस्थिती कितीही बिकट असली तरीही मनात जिद्द असेल तर तुम्ही यश मिळवताच याचे उदाहरण ठरले आहेत दुर्गम भागातील तीन आदिवासी विद्यार्थी. त्यांनी नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करत डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गडचिरोली : शहरात राहून उच्च शिक्षण घेणं आणि करिअर घडवणं अनेकांसाठी सोपं असतं, कारण तिथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतात. पण महाराष्ट्रातील सर्वात मागासलेल्या आदिम जमातींपैकी एक असलेल्या, दुर्गम गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं, ही खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आहे. कारमपल्लीचा देवदास, मल्लमपोडूरची सानिया आणि दुब्बागुड्याचा गुरुदास यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणलं आहे.
१४ जून रोजी जाहीर झालेल्या नीट NEET परीक्षेच्या निकालात भामरागड तालुक्यातील या तीन विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली. देवदास मंगू वाचामी (४७२ गुण), सानिया तुकाराम धुर्वे (३६४ गुण), आणि गुरुदास गिसू मिच्चा (३४८ गुण) अशी त्यांची नेत्रदीपक कामगिरी आहेत.सानिया आणि गुरुदास यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळा उपक्रमांतर्गत अनुक्रमे ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आलापल्ली आणि ज्ञानदीप हायस्कूल, सिरोंचा येथे झालं होतं. या तिन्ही विद्यार्थ्यांनी धाराशिवच्या ‘उलगुलान’ येथून नीट परीक्षेचे मार्गदर्शन मिळवले.
प्रतिकूल परिस्थितीतून प्रेरणादायी यश या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या पालकांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, देवदास आणि गुरुदास यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत तर सानियाचे वडील मल्लमपोडूर येथील शेतीत उत्पन्न नसल्यामुळे सूरजागड लोहखनिज प्रकल्पात ट्रक चालक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही या मुलांनी मिळवलेलं हे यश प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे.
प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचा गौरव या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागडमार्फत त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी सानियाशी संवाद साधताना तिला भविष्यात कुठे सेवा देणार याबद्दल विचारलं. त्यावर सानियाने, शहरात अनेक डॉक्टर उपलब्ध असले तरी, तिच्या गावात कुणीही डॉक्टर यायला तयार नसतात, त्यामुळे तिला आपल्या दुर्गम गावातच सेवा द्यायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली. श्री. गोयल यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही अडचणीत प्रकल्प कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली. सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण यांनी देवदास आणि गुरुदास यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांनीही सानियासारखेच विचार व्यक्त केले आणि आपल्या गावाची सेवा करण्याची इच्छा दर्शवली.
अतिमागास समजल्या जाणाऱ्या माडिया आदिम जमातीतील या विद्यार्थ्यांचं यश हे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मैलाचा दगड आणि यशाची नांदीच आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या या यशाने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि दुर्गम भागातूनही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द त्यांना मिळेल.
लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. राजकारण, व्यापार, देश-विदेश, क्रीडा, करिअर यांसारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे.
बीएमएमचं शिक्षण घेत असताना त्यांनी झी २४ तास या मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये न्यूज डेस्कवर काम केले . त्यादरम्यानच त्यांनी जनसंपर्क क्षेत्रातही काम केले. त्यावेळी राजकीय पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नियोजनात त्यांचा सहभाग होता. व्यावसायिक कॉन्फरन्सचे आयोजनामध्येही सक्रीय सहभाग घेतला. २०१७ मध्ये महाविद्यालयातील सहकाऱ्यांसोबत वेब महाराष्ट्र हे डिजिटल पोर्टल त्यांनी सुरू केले. ज्यात क्रीडा, राजकारण, देश-विदेश, सिनेमा यासाठी बातम्यांचे लेखन केले. पोर्टलचे सोशल मीडिया हँडलही त्यांनी सांभाळले. पुढे विविध इंस्टाग्राम पेजसाठीही कंटेन्टची निर्मिती केली.
२०२४ मध्ये त्यांनी नवराष्ट्र वृत्तपत्राच्या वेबसाईटसाठी न्यूज रायटर म्हणून काम केले. तेथे करिअर, महाराष्ट्र, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातम्या करण्यासोबत विविध राज्यातील विधानसभा निवडणूक , प्रचारसभा, निकाल यांचे विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी विशेषत: आंतरराष्ट्रीय, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना त्यांनी प्राधान्य दिलं. बिजनेस सक्सेस स्टोरी, मुंबई लोकल स्टेशनच्या नावाचा इतिहास, प्रजासत्ताक दिन आदी विषयांवर लेख मालिका लिहिली. यासोबत देश, स्थानिक स्तरावरील राजकारण क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बिहार, दिल्ली, मुंबई महापालिका, नगरपालिका निवडणूक, निकाल यांचे विश्लेषण केले.
शिक्षण क्षेत्र
२०१७ मध्ये त्यांनी व्याख्याता म्हणून साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि माध्यम विभागात शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पालघर येथील वाडा महाविद्यालय, मिरारोड येथील एल आर तिवारी महाविद्यालय, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात माध्यम विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय रिसर्च कॉन्फरन्समध्ये रिसर्च पेपरही सादर केला. सध्या ते साठ्ये महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात ९ वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.
शैक्षणिक पात्रता
नारायण परब यांनी २०१४ मध्ये साठ्ये महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. २०१७ मध्ये त्यांनी मुबई विद्यापीठातून जनसंवाद आणि पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात सामान्य-ज्ञान स्पर्धेत त्यांनी अनेक पारितोषिके जिंकली. वाचन, खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये त्यांना रुची आहे.… आणखी वाचा