IND vs SL Top News : भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्यात भारताच्या शिलेदारांनी १६५ धावांनी विजय मिळवला. देवदत्त पडिक्कल आणि मानव सुतार यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने एकतर्फी वर्चस्व राखले होते. पण एक असा आणखीन खेळाडू ज्याची चर्चा झाली ना कौतुक पण त्याचीही विजयात तितकीच महत्त्वाची भूमिका होती. श्रीलंकेच्या कर्णधाराने त्याचे उघडपणे नाव घेतले, तो खेळाडू कोण आहे? जाणून घ्या.
Dhananjay De Silva(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमधील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने १६५ धावांनी विजय मिळवत दमदार कामगिरी केली. भारताची ही ऐतिहासिक ६०० वी कसोटी होती. सोनल दिनुशा आणि धनंजय डिसिल्वा हे श्रीलंकेचे फलंदाज चिवट प्रतिकार करीत असताना भारतीय गोलंदाजांनी धावा रोखण्यास प्राधान्य देतानाच दडपण कायम ठेवले होते. ही जोडी फुटल्यावर बुधवारी भारतीयांनी श्रीलंकेचा दुसरा डाव झटपट संपवला. त्यात पहिल्या डावात प्रभावी ठरलेल्या मानव सुतारने प्रभावी कामगिरी केली. सुतारने या कसोटीत दहा विकेट घेतल्या. तर सामनावीर ठरलेल्या पडिक्कलने या सामन्यामध्ये २११ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. देवदत्त पडिक्कलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. सुतार आणि पडिक्कल तसे प्रमुख हिरो ठरले पण श्रीलंकेच्या कर्णधाराने तिसऱ्या खेळाडूचेही कौतुक केले. त्याच्यामुळे आम्ही मागे पडल्याचं धनंजय डी सिल्वा म्हणाला.
धनंजय डी सिल्वाने कोणाचं नाव घेतलं?
दुसऱ्या दिवसापासून संघ सामन्यात होता आणि चौथ्या डावातही खेळाडूंनी चांगला लढा दिला. गॅलेची खेळपट्टी पहिले तीन दिवस बॅटिंगसाठी चांगली होती, पण चौथा डाव इथे नेहमीच कठीण असतो. राहुलआणि पडिक्कलने चांगली सुरुवात करून मोठ्या धावा केल्या आणि आमच्यावर दबाव टाकला. टॉसही महत्त्वाचा ठरला कारण त्यांनी आधी फलंदाजी करून धावा केल्या, तर आम्ही बॅटिंग करताना लवकर विकेट गमावल्या आणि त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच अडचणीत सापडल्याचं धनंजय डी सिल्वा याने म्हटलं आहे. धनंजय डी सिल्वाच्या म्हणण्यानुसार पडिक्कलसोबत राहुलनेही पहिल्या डावात केलेल्या संयमी फलंदाजीमुळे लंकेवर दबाव आला.
India vs Pakistan Hockey : टीम इंडियाने 5 धडाकेबाज गोल ठोकले अन् पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, सरपंच हरमनप्रीतच्या टोळीचा धुमाकूळ!यशस्वी अफगाणिस्तानविरुद्ध ठरलेला मानव सुतार पुन्हा प्रभावी ठरला. त्याला रवींद्र जाडेजाच्या अनुभवाची साथ लाभली. वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना सुरुवातीस हादरे दिले. भारताला या कसोटीच्या अखेरच्या दिवशी सहा विकेटची गरज होती. सुरुवातीस भारतीयांना विकेटपासून दूर राहावे लागले. मात्र जाडेजाने दिवसातील दुसऱ्या हप्त्यात डिसिल्वाला चकवले. निरोशान डिकवेला याने चांगली सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वालच्या शेरेबाजीमुळे त्याचे लक्ष विचलित झाले. केशारा नूवांथाने दिनुशाला १५ षटके साथ दिली. दिनुशाकडून चूक झाली आणि त्यानंतर श्रीलंकेचा डाव कोसळला. सुतारच्या काहीशा जास्त उसळलेल्या सुतारच्या विकेटच्या षटकाराने भारताचा विजय जास्त झळाळला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा