Headlines

कोणाच्या लक्षात आलं नाही पण श्रीलंकेच्या कर्णधाराने पराभवासाठी तिसऱ्याच खेळाडूचं घेतलं नाव


IND vs SL Top News : भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्यात भारताच्या शिलेदारांनी १६५ धावांनी विजय मिळवला. देवदत्त पडिक्कल आणि मानव सुतार यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने एकतर्फी वर्चस्व राखले होते. पण एक असा आणखीन खेळाडू ज्याची चर्चा झाली ना कौतुक पण त्याचीही विजयात तितकीच महत्त्वाची भूमिका होती. श्रीलंकेच्या कर्णधाराने त्याचे उघडपणे नाव घेतले, तो खेळाडू कोण आहे? जाणून घ्या.

IND vs SL Turning Point
Dhananjay De Silva(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमधील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने १६५ धावांनी विजय मिळवत दमदार कामगिरी केली. भारताची ही ऐतिहासिक ६०० वी कसोटी होती. सोनल दिनुशा आणि धनंजय डिसिल्वा हे श्रीलंकेचे फलंदाज चिवट प्रतिकार करीत असताना भारतीय गोलंदाजांनी धावा रोखण्यास प्राधान्य देतानाच दडपण कायम ठेवले होते. ही जोडी फुटल्यावर बुधवारी भारतीयांनी श्रीलंकेचा दुसरा डाव झटपट संपवला. त्यात पहिल्या डावात प्रभावी ठरलेल्या मानव सुतारने प्रभावी कामगिरी केली. सुतारने या कसोटीत दहा विकेट घेतल्या. तर सामनावीर ठरलेल्या पडिक्कलने या सामन्यामध्ये २११ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. देवदत्त पडिक्कलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. सुतार आणि पडिक्कल तसे प्रमुख हिरो ठरले पण श्रीलंकेच्या कर्णधाराने तिसऱ्या खेळाडूचेही कौतुक केले. त्याच्यामुळे आम्ही मागे पडल्याचं धनंजय डी सिल्वा म्हणाला.

धनंजय डी सिल्वाने कोणाचं नाव घेतलं?

दुसऱ्या दिवसापासून संघ सामन्यात होता आणि चौथ्या डावातही खेळाडूंनी चांगला लढा दिला. गॅलेची खेळपट्टी पहिले तीन दिवस बॅटिंगसाठी चांगली होती, पण चौथा डाव इथे नेहमीच कठीण असतो. राहुलआणि पडिक्कलने चांगली सुरुवात करून मोठ्या धावा केल्या आणि आमच्यावर दबाव टाकला. टॉसही महत्त्वाचा ठरला कारण त्यांनी आधी फलंदाजी करून धावा केल्या, तर आम्ही बॅटिंग करताना लवकर विकेट गमावल्या आणि त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच अडचणीत सापडल्याचं धनंजय डी सिल्वा याने म्हटलं आहे. धनंजय डी सिल्वाच्या म्हणण्यानुसार पडिक्कलसोबत राहुलनेही पहिल्या डावात केलेल्या संयमी फलंदाजीमुळे लंकेवर दबाव आला.

Maharashtra TimesDuleep Trophy Final Venue Changed : दुलीप ट्रॉफी सुरु होण्याआधीच मोठा ट्विस्ट! BCCIने फायनलचं ठरलेलं मैदान अचानक बदललं; नेमकं कारण काय?मानवने ७६व्या षटकांत दिनुशाला टिपले. त्याने दहा चेडूंत चौघांना बाद केले. त्यामुळे ७५ षटकाअखेर ६ बाद १९९वरून श्रीलंकेचा दुसरा डाव ७७.४ षटकांत २०६ धावांत आटोपला. भारतासाठी हा विजय मोलाचा आहे. फिरकी गोलंदाजीस अनुकूल खेळपट्ट्यांवर भारतीय संघाने गेल्या तीनपैकी दोन मालिका गमावल्या होत्या. हे लक्षात घेतल्यास श्रीलंकेसाठी फिरकीचा गड असलेल्या गॉलवरील एकतर्फी विजय नक्कीच समाधान देणारा आहे.

Maharashtra TimesIndia vs Pakistan Hockey : टीम इंडियाने 5 धडाकेबाज गोल ठोकले अन् पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, सरपंच हरमनप्रीतच्या टोळीचा धुमाकूळ!यशस्वी अफगाणिस्तानविरुद्ध ठरलेला मानव सुतार पुन्हा प्रभावी ठरला. त्याला रवींद्र जाडेजाच्या अनुभवाची साथ लाभली. वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना सुरुवातीस हादरे दिले. भारताला या कसोटीच्या अखेरच्या दिवशी सहा विकेटची गरज होती. सुरुवातीस भारतीयांना विकेटपासून दूर राहावे लागले. मात्र जाडेजाने दिवसातील दुसऱ्या हप्त्यात डिसिल्वाला चकवले. निरोशान डिकवेला याने चांगली सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वालच्या शेरेबाजीमुळे त्याचे लक्ष विचलित झाले. केशारा नूवांथाने दिनुशाला १५ षटके साथ दिली. दिनुशाकडून चूक झाली आणि त्यानंतर श्रीलंकेचा डाव कोसळला. सुतारच्या काहीशा जास्त उसळलेल्या सुतारच्या विकेटच्या षटकाराने भारताचा विजय जास्त झळाळला.