Headlines

कोट्यावधी रुपये खर्चले नव्या इमारतीवर पण अखेर घटनेची पुनरावृत्ती झालीच ; नव्या इमारतीतही जुनेच मरण !


Amravati Hospital NICU Fire : अमरावती जिल्ह्या स्त्री रुग्णालयात झालेली आगीची घटना म्हणजे भूतकाळाची पुनरावृत्ती आहे. तीन वर्षापूर्वी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग लागून एका बालकाचा त्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ही इमारत नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नवी इमारत बांधण्यात आली.पण नव्या इमारतीतही हाच प्रकार पुन्हा घडला .

नव्या इमारतीतही जुनेच मरण
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,अमरावती :तीन वर्षांपूर्वी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात भीषण आग लागून एका बालकाचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आणि कोट्यवधी रुपये खर्चून आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नवीन इमारत उभारण्यात आली. मात्र, तीन वर्षांनंतर त्याच दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती नव्या इमारतीत झाल्याने आरोग्य यंत्रणेचा निष्काळजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

सर्व काही अद्ययावत असतानाहीएवढी मोठी आग कशी लागली

जिल्हा स्त्री रुग्णालयाची नवीन इमारत अवघ्या वर्षभरापूर्वीच सेवेत दाखल झाली. येथील वायरिंग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन लाइन आणि अन्य साहित्य नवीन आहे. सर्व काही अद्ययावत असतानाही पहाटेच्या सुमारास एवढी मोठी आग कशी लागली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन प्रश्न ऐरणीवर

वर्षभरातच नव्या इमारतीत भीषण दुर्घटना घडल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इमारत उभारताना इलेक्ट्रिकल कामात किंवा वायरिंगमध्ये काही गंभीर दोष होते का, नवीन उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाले का, फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन केवळ कागदावरच झाले होते का, अशी विचारणा होत आहे.

चिमुकल्यांचा बळी

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक दोषांमुळे हा अपघात झाला की प्रशासकीय हलगर्जीमुळे तीन निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला, याचा शोध घेतला जात आहे.

उपचाराचा खर्च सरकारकडून

जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत उर्वरित ३६ चिमुकल्यांचा जीव वाचवला.या सर्व बालकांना सुरक्षित बाहेर काढून शहरातील सरकारी आणि विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आलेल्या एकाही बालकाच्या पालकांकडून वैद्यकीय अपचाराने कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये.

Maharashtra TimesAmravati Fire : बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो

प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे भयभीत पालकांना दिलासा

या सर्व बालकांच्या वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दिल्या आहेत. सध्या या बालकांना शहरातील पीडीएमसी , सुपर हॉसिपिटल , मुरके हॉस्पि़टल, पारिजात हॉस्पिटल आणि होप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्याव उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे भयभीत पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra TimesNagpur Chlorine Gas Leak: क्लोरिन गळतीने गुदमरले गोधनी! जलशुद्धीकरण केंद्रातून पसरला विषारी वायू; 56 बाधित, 8 जण अतिदक्षता विभागात

जखमी बालकांना हलविण्यात आलेली रुग्णालये

. डॉ,.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय :११ बालके

. सुपर हॉस्पिटल :५ बालके

. डॉ. मुरके बालरुग्णालय : ८ बालके

. पारिजात हॉस्पिटल :२ बालके

. होप हॉस्पिटल : ६ बालके

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा