Kishore Kumar Story : किशोर कुमार हे दिग्गज अभिनेते आणि गायक होते. इंडस्ट्रीतील अनेकांसोबत काम केल्यामुळे त्यांचे काही किस्से ही खूप चर्चेत आलेले.

4 ऑगस्ट 1929 रोजी जन्मलेल्या किशोर कुमार यांची गाणी त्यांच्या चाहत्यांना आजही खूप आवडतात. त्यांच्याशी संबधित अक रंजक किस्सा जाणून घेऊ.
किशोर कुमार यांच्यावर ‘ऑल इंडिया रेडिओ’ने बंदी का घातली होती?
किशोर कुमार यांना लहानपणापासूनच गायक बनायची इच्छा होती. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार, हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आधीच एक मोठे स्टार होते. संगीताचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नसतानाही, भावाच्या सल्ल्यानुसार किशोर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमायचे ठरवले; मात्र त्यांना अशोक कुमार यांच्याइतके यश मिळाले नाही. 1948 मधील ‘जिद्दी’ या चित्रपटात त्यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली. या गाण्यामुळे त्यांना म्युझिक इंडस्ट्रीत प्रवेश तर मिळाला, पण ज्या यशाची ते वाट पाहत होते, ते मात्र त्यांना मिळत नव्हते.
Urvashi Rautela Troll : मिस युनिव्हर्स इंडिया 2026 मध्ये परीक्षक म्हणून गेलेल्या उर्वशीने परिधान केला तिरंग्याचा गाऊन, राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने भडकले लोक
1969 मधील ‘आराधना’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली; या चित्रपटातील “मेरे सपनों की रानी” हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले. या गाण्यानंतर राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांची जोडी अत्यंत गाजली. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू असताना, सरकारने त्यांना ‘ऑल इंडिया रेडिओ’साठी गाणे गाण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला; परिणामी, त्यांच्यावर ‘ऑल इंडिया रेडिओ’ आणि ‘दूरदर्शन’ या दोन्ही माध्यमांवर बंदी घालण्यात आली.
8000 रुपयांची थकबाकी न मिळाल्यामुळे एका निर्मात्याच्या घराबाहेर गोंधळ घातला
किशोर कुमार हे त्यांच्या काळातील अत्यंत लहरी (मूडी) गायक म्हणून ओळखले जात असत. एकदा त्यांनी आर. सी. तलवार या त्या काळातील एका निर्मात्याच्या घराबाहेर चांगलाच गोंधळ घातला होता. तलवार यांच्याकडे त्यांची 8 हजार रुपयांची रक्कम येणे बाकी होते, त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. किशोर कुमार वारंवार त्या निर्मात्याच्या घरी जाऊन नाचत आणि ओरडत असत, “अरे तलवार, माझे आठ हजार रुपये दे.” इतकेच नाही, तर त्यांनी स्वतःच्या घराबाहेर “किशोर कुमारपासून सावध राहा” अशी पाटीही लावली होती.
Himanshi Khurana : 27 नोव्हेंबर 2023 ची ती सकाळ आठवतेय? CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं आहे; आसीम रियाजच्या पुराव्यांच्या विधानावर हिमांशीचं प्रत्युत्तर
एके दिवशी, जेव्हा दिग्दर्शक एच. एस. रावल किशोर कुमार यांच्या घरी पोहोचले, तेव्हा या गायकाने त्यांच्या हाताचा चावा घेतला. दिग्दर्शकाने याचे कारण विचारले असता, किशोर कुमार यांनी स्मितहास्य केले आणि बाहेर लावलेला फलक त्यांनी वाचला नाही का, अशी विचारणा केली. ‘मेरे सपनों की रानी’ व्यतिरिक्त, किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला ‘रूप तेरा मस्ताना’, ‘पल-पल दिल के पास’ आणि ‘ओ मेरे दिल के चैन’ यांसारखी अनेक अजरामर गाणी दिली.
अशोक कुमार हे त्यांचे थोरले बंधू होते पण त्यांना हे वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत ठाऊकच नव्हते. किशोर कुमार वर्षाचे असतानाच अशोक कुमार कामानिमित्त बाहेर गेलेले. जेव्हा ते परत आले तेव्हा किशोर कुमार 4 वर्षांचे झालेले. आई आपल्याशिवाय इतक कोणाचे लाड करतेय हे त्यांना सहन झाले नाही. जेव्हा त्यांनी याबद्दल जाब विचारला तेव्हा त्यांना घरात आलेला नवा माणूस आपला सख्खा भाऊ असल्याचे समजले होते. पुढे त्यांच्याच मदतीने ते सिनेइंडस्ट्रीत आले.

