Shubman Gill News : भारताचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला होता. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार पहिल्या सामन्यावेळी फलंदाजीबाबत केलेल्या वक्तव्याने तो तोंडावर पडलाय, नेमकं काय म्हणालेला जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये यजमान इंग्लंडने ४ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताची फलंदाजी ढेपाळल्याचं स्पष्टपणे दिसलं. या पराभवाच्या मागे फलंदजांनी केलेली निराशाच हेच एकमेव कारण ठरले. कारण भारतीय संघ २३३ धावांवरच ऑल आऊट झाला, यामध्ये फक्त विराट कोहलीने ६५ धावा आणि श्रेयस अय्यरने ६६ धावा करत केले होते. यावरून कॅप्टन शुभमन याचा फुगीर आत्मविश्वास हा स्पष्टपणे दिसून आला, नेमकं गिल काय म्हणाला होता.
शुभमन गिल काय म्हणाला?
इंग्लंडविरुद्धच्या वनडे क्रिकेट मालिकेतील पहिली लढत जिंकल्यानंतर, भारताची फलंदाजी अनुभवी आहे, त्यामुळे आम्ही सव्वातीनशे धावांचा पाठलाग सहज करू शकतो, असं शुभमन गिल म्हणाला होता. मात्र भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात ३० षटकातील ३ बाद १६८ या भक्कम पायाभरणीनंतरही २३३ धावाच करता आल्या. इंग्लंड संघाने हे आव्हान ४४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. Rohit Sharma : रोहित शर्माचा लॉर्ड्सवर शेवटचा सामना? हिटमॅनला वगळत BCCIकडून मिशन वर्ल्ड कप 2027ची तयारी, युवा खेळाडूला मिळणार संधी शुभमन गिलने वेगवान सुरुवात करून दिली. मात्र रोहित शर्मा धार्वासाठी संघर्ष करीत होता. त्याला जीवदानाचा फायदा घेता आला नाही. विराट कोहलीने एक बाजू भक्कमपणे लावून धरत डावास स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. त्याने आणि श्रेयसने धावगतीस वेग देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून भारतास अडीचशेच्या नजिक नेले. IND vs ENG 2nd ODI : इंग्लंडचा भारतावर 4 विकेटने विजय! ‘मला त्यांच्याकडून आशा होती’; कॅप्टन गिलने सांगितलं मॅच नेमकी कुठे गमावली? दरम्यान, विराट, श्रेयस तसेच काही प्रमाणात शुभमन सोडल्यास भारताच्या एकाही फलंदाजाची खेळी मोठ्या धावसंख्येसाठी आवश्यक असलेली नव्हती. जोफ्रा आर्चरने भारताचे तळाचे फलंदाज सतावणार नाही ही काळजी घेतली. खेळपट्टी फलंदाजांना चांगली साथ देणारी आहे. आऊटफील्डही वेगवान आहे, पण भारतीयांना फारसे काही साधले नाही. रोहितसह शुभमन गिलने ४४ धावांची तर विराट कोहलीने ६१ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. या दोन्ही भागीत रोहितच्या सहकाऱ्यांचा वेग खूपच जास्त होता. विराट आणि श्रेयसने ६७ चेंडूंत ६७ धावांचा चोप दिला. मात्र ३१.४ षटकांतील ३ बाद १७८ या सुस्थितीनंतर भारताचा डाव ४४ षटकांत २३३ धावांवर ऑल आऊट झाला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा