Headlines

कल्याण- डोंबिवलीमध्ये उत्सव मार्गांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १२० हून जास्त सीसीटीव्हींच्या नजरा खिळणार


Thane News: स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ऐन उत्सवांच्या दिवसांत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या स्वरूपात कल्याण डोंबिवली उत्सव मार्गांवर अधिक १२० पेक्षा जास्त कॅमेरे बसवण्यात येणार आहे.

उत्सवांवर नजरा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा,कल्याण :स्मार्ट सिटी योजनेतून शहरात चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले, तरी उत्सवकाळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. कल्याण आणि डोंबिवलीतील उत्सव मार्गावर जवळपास १२०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन विद्युत विभागाकडून करण्यात आले आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

विसर्जनस्थळेही सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली

स्मार्ट सिटी प्रकल्पातून रस्ते सीसीटीव्हीच्या सुरक्षेखाली आणण्यात आले असले, तरी उत्सवाची ठिकाणे आणि विसर्जनस्थळेही सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असल्यास नागरिकांना सुरक्षितपणे वावरणे सोयीचे होऊ शकते. याच कारणास्तव कल्याण-डोंबिवली महापालिका दरवर्षी उत्सवकाळात जनरेटर, विद्युत व्यवस्थेसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून देते.

विसर्जनस्थळी कॅमेरे बसविले जाणार

यंदाही शनिवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी मोठ्या दहीहंडीउभारल्या जातात, त्या सर्व चौकांत कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर विसर्जनस्थळी कॅमेरे बसविले जाणार आहेत. यात अ प्रभागात १२, ब प्रभागात ३६, क प्रभागात सर्वाधिक ५६, जे प्रभागात ४, आय प्रभागात ४ आणि डोंबिवली पश्चिमेकडे ८ असे एकूण १२० कॅमेरे बसविले जाणार आहेत. यात ज्या ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते, त्या सर्व ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra TimesBandra Accident : 15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण मोबाईलवर बोलत कार चालवणाऱ्या महिलेने काळजाचा तुकडा हिरावला, मुलगा गेल्याचं सत्य आई अजून स्वीकारेना

कायदा – सुव्यवस्था राखण्यास मदत

या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार असल्यामुळे पोलिसांना सुरक्षेसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. गणेशोत्सवानंतरहे कॅमेरे काढले जाणार असले,तरी उत्सवकाळात कायदा- सुव्यवस्था राखण्यास या कॅमेऱ्यांची मोठी मदत होणार आहे. याखेरीज आवश्यकता असलेल्या ठिकाणी हॅलोजनसह विद्युत व्यवस्था करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा