मराठी चित्रपटांचा वाढता विस्तार आणि विविध भाषांतील कलाकारांचं वाढतं सहकार्य याचं हे आणखी एक उदाहरण मानलं जात आहे. या चित्रपटात गरुडा रामसोबत दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता श्रवण राघवेंद्रही दिसणार आहे. विशेष म्हणजे, आध्यात्मिक आशय असलेल्या या कथेला दमदार अॅक्शनची जोड देण्यात आली असून, ‘पुष्पा’ फेम अॅक्शन मास्टर कार्तिक डंगरी यानं अॅक्शन दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
Tejaswini Pandit On Jyoti Chandekar : आमचे आई बाबा दोघेही गेले, आता मला ‘अचानक’ या शब्दाचीच भीती वाटतेय! ज्योती चांदेकर यांच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावुक
गरुडा राम म्हणाला, ‘मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मला नेहमीच विशेष आदर वाटत आला आहे. इथल्या कथा, भावना आणि अभिनयाचा दर्जा समृद्ध आहे. ‘देवघर ऑन रेंट’ची कथा ऐकल्यानंतर मला ती आवडली. माझी भूमिका केवळ अॅक्शनपुरती मर्यादित नसून तिच्यात अनेक भावनिक आणि नाट्यमय पैलू आहेत. मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी मला आजवर विविध भाषांतील चित्रपटांत स्वीकारलं आहे. आता मराठी प्रेक्षकही माझ्या या नव्या भूमिकेला तितक्याच प्रेमानं प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे’.
Twinkle Khanna On Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंमुळे वाढलं ट्विंकल खन्नाचं काम, आता घरीच बनवावं लागतंय पनीर, आईसोबतच्या मजेशीर भांडणाचा किस्सा शेअर
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले असून, स्वरूप सावंत यांनी दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण आणि गौतमी पाटील यांच्याही महत्त्वापूर्ण भूमिका आहेत. आध्यात्म, नाट्य आणि अॅक्शन यांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार असल्याचं कलाकार सांगतात. निर्माते सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
केव्हा प्रदर्शित होणार सिनेमा?
हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
कोण आहे अभिनेता गरुडा राम?
‘केजीएफ: चॅप्टर १’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये आपल्या क्रूर आणि जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांवर छाप पाडणारा अभिनेता रामचंद्र राजू उर्फ ‘गरुडा राम’ (आज दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेला व्हिलन बनला आहे.
सुपरस्टार यशचा बॉडीगार्ड ते मुख्य खलनायक
गरुडा रामचा अभिनय क्षेत्रातील प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तो कन्नड सुपरस्टार यशचा मुख्य बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ‘केजीएफ’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी जेव्हा यशसोबतच्या संवादादरम्यान गरुडा रामची शरीरयष्टी आणि त्याचे व्यक्तिमत्त्व पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेचच त्याला ‘गरुडा’ या मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडलं. या भूमिकेसाठी गरुडा रामनं तब्बल वर्षभर कठोर मेहनत घेऊन आपली शरीरयष्टी आणि अभिनय उंचावला.
या एकाच भूमिकेनं त्याचं आयुष्य रातोरात बदलले. त्याच्या दमदार आणि क्रूर लूकमुळं त्याला सर्वभाषिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही दबदबा’केजीएफ’च्या प्रचंड यशानंतर गरुडा रामला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून ऑफर्सचा पाऊस पडू लागला.
कार्तीसोबत ‘सुल्तान’, तसंच ‘कोडीयिल ओरुवन’ आणि ‘यानई’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत मुख्य व्हिलन त्यानं काम केलंय.
‘महासमुद्रम’, पवन कल्याणचा ‘भीमला नायक’ आणि प्रभासचा ब्लॉकबस्टर ‘सालार’ मधील महत्त्वपूर्ण भूमिकाही त्याच्या गाजल्या. सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘आराट्टू’ चित्रपटातून त्यानं मल्याळममध्ये पदार्पण केलंय.
त्यामुळे आता त्याला मराठी सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

