Headlines

लता मंगेशकर नाट्यगृहात एसी बंद पडण्याची नाट्यमय मालिका सुरुच; सरनाईकांच्या कार्यक्रमात गारवा गुल,प्रेक्षकांनी सोडले नाट्यगृह


Thane News: मिरा- भाईंदर महापालिकेच्या लता मंगेशकर नाट्यगृहात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी करण्यात आला. या वेळी नाट्यगृहातील एसी बंद पडल्याने प्रेक्षक चांगलेच हैराण झाले. एसी बंद पडण्याचा हा नवखा प्रकार नसून ‘आमने-सामने ‘नाटकाच्या प्रयोगाला देखील एसी यंत्रणा बंद पडली होती.

लता मंगेशकर नाट्यगृह
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्व. लता मंगेशकर नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणेतील घोळ कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याने सभागृहात उकाडा वाढला. त्यामुळे काही प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कार्यक्रम अर्धवट सोडून बाहेर पडणे पसंत केले. या प्रकाराबद्दल कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेकडो गणेशभक्तांची उपस्थिती

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत मिरा-भाईंदर महापालिकेचे स्व. लता मंगेशकर नाट्यगृह आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी हे नाट्यगृह उभारण्यात आले. येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री प्रताप सरनाईक यांनी गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहरातील शेकडो गणेशभक्त उपस्थित होते.

प्रेक्षक नाट्यगृहातून बाहेर पडले

कार्यक्रम सुरू असताना नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा बंद होती. काही वेळातच सभागृहात उकाडा वाढला. अनेक प्रेक्षक घामाने हैराण झाले, तर काहींना गुदमरल्यासारखे वाटू लागल्याने त्यांनी नाट्यगृहातून बाहेर पडणे पसंत केले.

देखभाल-दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च तरी देखील असा प्रकार घडला

कार्यक्रम तासभराहून अधिक काळ सुरू असतानाही पर्यायी व्यवस्था करण्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा आणि इतर देखभाल-दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च झाले असतानाही वारंवार यंत्रणा बंद पडत असल्याने कामाच्या दर्जावर आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Maharashtra TimesMumbai High Court: इस्लाम धर्म स्वीकारल्याने ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस नगरसेविकेला मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला?

आमने- सामने नाटकाच्या प्रयोगादरम्यानही प्रेक्षक घामाघूम

मे महिन्यात ‘आमने-सामने’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना वातानुकूलन यंत्रणा बंद पडली होती. त्या वेळी गॅस गळतीचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले होते. भर उन्हाळ्यात नाट्यप्रेमींना उकाड्यातच प्रयोग पाहावा लागला होता.

Maharashtra TimesThane News: कल्याण- डोंबिवलीमध्ये उत्सव मार्गांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १२० हून जास्त सीसीटीव्हींच्या नजरा खिळणार

गॅस गळतीचे कारण

हा प्रकार पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. रविवारीही यंत्रणा बंद असण्यामागे गॅस गळतीचे कारण सांगितले जात असल्याचे समजते.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा