देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला नीट परीक्षेचा मुद्दा सध्या पेटलाय. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाची धग पाहायला मिळतेय. पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधूर, विरोधकांची निदर्शने अन् विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष… या सगळ्यात आता देशातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा उडी घेतलीय. अण्णा हजारेंनी आता थेट ‘मौन आंदोलनाचं’ हत्यार उपसलंय. अहिल्यानगरमध्ये एक प्रतीकात्मक ‘जंतरमंतर’ उभं राहिलं आणि अण्णांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ठणकावून सांगितलंय— ‘दडपशाही नको, विद्यार्थ्यांशी संवाद साधा!’पण अण्णा हजारेंनी अचानक ही भूमिका का घेतली? या आंदोलनाची ताकद काय आहे? आणि मध्येच ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अभिजीत दीपके अण्णांबद्दल काय म्हणाले? या सगळ्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत..