Yashasvi Jaiswal Pulls Off Stunning Catch Video Goes Viral | What a Catch! यशस्वी जैस्वालची सुपरमॅन झेप, भन्नाट कॅच पाहून फॅन्स झाले क्रेझी, व्हिडीओ व्हायरल
Yashasvi Jaiswal Pulls Off Stunning Catch Video Goes Viral | What a Catch! यशस्वी जैस्वालची सुपरमॅन झेप, भन्नाट कॅच पाहून फॅन्स झाले क्रेझी, व्हिडीओ व्हायरल
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेतला. लाहिरू उदाराला एका धावेवर बाद केलं. त्यामुळे फॅन्स खुश आहेत. आणि त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून श्रीलंकेच्या फलंदाजांना गुडघ्यावर आणलंय. आणि सध्याची परिस्थिती पाहता, श्रीलंकेचा पहिला डाव ३०० धावांच्या आतच संपेल, अशी शक्यता दिसत आहे. पण याच पार्श्वभूमीवर यशस्वी जैस्वालने घेतलेला अप्रतिम झेल सध्या खूपच चर्चेत आहे. त्यानं डावीकडे झेप घेत जबरदस्त झेल घेतला. या झेलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून क्रिकेट फॅन्स त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. (फोटो सौजन्य – @Maina_Singhx77/x.com)
यशस्वी जैस्वाल पुन्हा चर्चेत
यशस्वी जैस्वाल सध्या या सामन्यात खूपच चर्चेत आहे. फलंदाजी करत असताना असिथा फर्नांडोसोबत त्याची शाब्दिक चकमक उडाली होती. या वादामुळे ICCने यशस्वीला मॅच फीच्या २५ टक्के दंड केला होता. त्यामुळे उर्वरित सामन्यात तो काय करतो, याकडे सर्वांचंच लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर त्यानं घेतलेला झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानं लांबलचक उडी घेत झेल पकडत लाहिरू उदाराला बाद केलं. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर हा झेल पकडला. उदारा फक्त १ धाव करून बाद झाला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार आनंद साजरा केला. यशस्वीही खूप आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसला.
नेटकऱ्यांकडून यशस्वीचं कौतुक
नेटकरी यशस्वी जैस्वालने घेतलेल्या कॅचचं भरभरून कौतुक करत आहेत. कारण लाहिरू उदारा हा अत्यंत चिवट फलंदाज म्हणून ओळखला जातो. जर तो खेळपट्टीवर स्थिरावला असता, तर त्यानं संयमी फलंदाजी करून श्रीलंकेला या सामन्यात जिवंत ठेवलं असतं. असो, पण तुम्हाला यशस्वीने घेतलेला हा झेल कसा वाटला? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया द्या.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा