Headlines

बॉडी डबल परवेझ काझीच्या कठीण काळात सलमान खान मदतीला धावला, फक्त खर्चाची जबाबदारी उचलली नाही तर, हॉस्पिटलमध्ये थांबला भाईजान


मुंबई:बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या सिनेमांसोबतच त्याच्या मदतकार्यासाठीही ओळखला जातो.कुटुंबिय असोत किंवा मित्र-मैत्रिणी, किंवा एखादा चाहता…गरज असले त्याच्या मदतीला सलमान खान धावून जात असतो. नुकताच याचा आणखी एक प्रत्यय आला. सलमान खानचा अनेक वर्षांपासून बॉडी डबल म्हणून काम करणाऱ्या परवेझ काझीची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याच्यावर हृदयाशी संबंधित एक लहान शस्त्रक्रिया करावी लागली.

बॉडी डबल परवेझ काझीच्या या कठीण काळात सलमान खाननं स्वतः पुढाकार घेत त्याच्या उपचारांची आणि वैद्यकीय खर्चाची पूर्ण जबाबदारी उचलली आहे.

Maharashtra TimesAadesh Bandekar Home Minister : आदेश बांदेकरांच्या होम मिनिस्टरचं दणक्यात पुनरागमन, कोल्हापूरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियात नोंद
काय घडलं नेमकं?

तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला परवेझ काझीला घरी असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं डॉक्टरांनी त्याच्यावर एक लहान हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला परवेझला शूटिंगदरम्यान हार्ट अटॅक आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, परवेझचे मॅनेजर पीयुष यांनी या अफवांचे खंडन केलं. पीयुष यांनी स्पष्ट केलं की, परवेझला हार्ट अटॅक आला नव्हता, तर नियमित तपासणीनंतर डॉक्टरांनी लहान शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सलमान सर परवेझला आपल्या लहान भावासारखे मानतात. या आजारपणाची माहिती मिळताच सलमान सर त्वरित मदतीला धावले आणि उपचारादरम्यान आमच्यासोबत रुग्णालयात उपस्थित राहिले.

कोण आहे परवेझ काझी ?

परवेझ काझी हा गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानचा मुख्य बॉडी डबल म्हणून काम करत आहे. त्यानं सलमानच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट आणि बॉडी डबलची दृश्ये साकारली आहेत. प्रेम रतन धन पायो, सुलतान ,टायगर जिंदा है, रेस ३ , भारत ,दबंग ३ , राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई . अशा सिनेमांत त्यानं सलमानसाठी काम केलंय. तर तो सोशल मीडियावरही कमालीचा लोकप्रिय आहे.

Maharashtra TimesKangana Ranaut On Kriti Sanon : ‘अंतर्वस्त्र घालून कोण भावाला राखी बांधतं’, क्रितीच्या रक्षाबंधन स्पेशल जाहिरातीतील लुकवर कंगना रणौतची जोरदार टीका
सध्या सलमान खान दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्या आगामी ‘मॉन्स्टर’ या पॅन-इंडिया ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. फिल्मसिटीमध्ये यासाठी मोठा सेट उभारण्यात आला असून एका कोरियन स्टंट टीमच्या मदतीनं ॲक्शन सीन्स डिझाइन केले जात आहेत. परवेझच्या शस्त्रक्रियेमुळं स्टंट शेड्युलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं थोडे बदल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असून त्याची प्रकृती आता उत्तम आहे. तो लवकरच पूर्णपणे बरा होऊन पुन्हा एकदा शूटिंगच्या सेटवर परतणार आहे.