Headlines

Yami Gautam On Bollywood And Starkids ; Yami Gautam : हिट सिनेमे देऊनही पदरी निराशाच, स्टाककिड्सला वैतागून बॉलिवूड सोडणार होती यामी गौतम, या सिनेमानं बदललं आयुष्य


Yami Gautam On Bollywood : अभिनेत्री यामी गौतमच्या नावे नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. पण तिच्या आयुष्यात एक काळ असाही होता जेव्हा तिने खचून बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

yami gautam
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम ही बरेचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातल्या काही आठवणींचा खुलासा केला त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामीने तिच्या कारकर्दीत अनेक उत्तम सिनेमांमध्ये काम केले आहे. पण 2019 मध्ये आलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमामुळे तिला विशेष ओळख मिळाली. पण या सिनेमापूर्वी तिच्या मनात बॉलिवूड सोडण्याचे विचार आले होते.

‘विकी डोनर’नंतर चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत यामीने सांगितले की, 2012 मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. हा सिनेमा चांगलाच गाजला. विकी डोनर या सिनेमात आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका होती. या सिनेमामुळे त्याचे करियर उच्च शिखराला जाऊन पोहचले पण यामीला मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. तिला अनेक वर्षे चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. यामुळे निराश होऊन तिने हिमाचल प्रदेशला परत जाण्याची तयारीही केली होती. तिने नमूद केले की, बॉलिवूडमधील लोक तिला इतर नायिकांच्या नजरेतून पाहत नसत आणि याचा परिणाम तिच्या कारकिर्दीवर झाला.

‘मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता’

यामी म्हणाली, “उरी आणि बाला या चित्रपटांपूर्वी मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी हिमाचलत परत जाण्याचे ठरवले होते. तिथे आमची शेतजमीन आहे आणि तिथेच नवीन आयुष्य सुरू करण्याचा माझा विचार होता. माझ्या पालकांनी मला या निर्णयासाठी पूर्ण पाठिंबा दिला आणि घरी परतण्यास सांगितले; पण ज्या क्षणी मी या क्षेत्राबद्दलची भीती मनातून काढून टाकली, त्या क्षणी सर्व काही बदलले. मला उरी आणि बाला हे चित्रपट मिळाले आणि माझे आयुष्य एका रात्रीत बदलून गेले.”

‘स्टार किड्स’बद्दल मोकळेपणाने भाष्य

यामी गौतमने चित्रपटसृष्टीत आउटसाइडर व्यक्ती म्हणून आलेल्या आपल्या अनुभवांबद्दलही सांगितले. तिने नमूद केले की, ‘स्टार किड्स’ना वारंवार संधी मिळतात, तर बाहेरून आलेल्या कलाकारांना केवळ एक चांगली संधी मिळवण्यासाठीही दीर्घकाळ संघर्ष करावा लागतो.

मला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावं लागायचं…

अभिनेत्री म्हणाली, “केवळ आऊटसाइडर असणं हीच काही एकमेव अडचण नव्हती; तर प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावं लागणं हे जास्त आव्हानात्मक होतं. असे काही क्षण असायचे जेव्हा मी एखाद्या भूमिकेसाठी पूर्णपणे सज्ज असायचे, तरीही तीच संधी वारंवार दुसऱ्या कोणालातरी मिळायची; कारण ती व्यक्ती आधीपासूनच या इंडस्ट्रीचा भाग होती. त्या काळात हीच गोष्ट सर्वात जास्त निराशाजनक वाटायची.”

Maharashtra TimesLock Upp 2 : ‘बडे अच्छे…’ च्या यशाने डोक्यात हवा, सेटवर दारु पिऊन तमाशा; आयुष्याने घडवली अद्दल; डॉक्टरांनी दिलेले शेवटचे ६ महिने

इंड्रस्ट्रीतल्या पक्षापातामुळे निराशा…

एका मुलाखतीत यामीने खुलासा केला की, तिला चित्रपटसृष्टीत पक्षपाताचा सामना करावा लागला होता, त्यामुळे तिला खूप दुःख झाले होते. तिने सांगितले की, अनेकदा चित्रपटांबाबतच्या चर्चा अचानक थांबवल्या जायच्या आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना हातातून संधी निसटून जायच्या. यामीला वाटते की काळानुसार परिस्थितीत खूप बदल झाला आहे. ती म्हणाली, “आजच्या प्रेक्षकांना या गोष्टीशी काही देणेघेणे नसते की तुम्ही कुठून आला आहात. ते फक्त हे पाहतात की तुम्ही कसे कलाकार आहात आणि तुमचा चित्रपट पाहण्यासारखा आहे की नाही? प्रेक्षकांचा हा विश्वास पुढच्या पिढीसाठी मोठी आशा निर्माण करतो.”

यामी गौतम या चित्रपटात अखेरची दिसली होती

यामी गौतमच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची ‘हक’ या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत दिसली होती. हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु बॉक्स ऑफिसवर त्याला विशेष यश मिळाले नाही. सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्सवरवर उपलब्ध आहे. त्यानंतर, अलीकडेच यामीने ‘धुरंधर 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. तिचा तो कॅमिओ रोल पाहूनही प्रेक्षक खूप खुश झाले.

Maharashtra TimesManish Paul : साधं रुमचं भाडं भरायला नसायचे पैसे, मित्रांचा सल्ला घेतला मनावर अन् बदललं मनीष पॉलचं नशीब

यामी गौतमचा आगामी चित्रपट

यामी गौतम लवकरच ‘नई नवेली’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट असून प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे, मात्र रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

‘आर्टिकल 370’ साठी यामी गौतमला राष्ट्रीय पुरस्कार

यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाला नुकताच 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’चा बहुमान मिळाला आहे. यासोबतच, या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी यामी गौतमला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा राष्ट्रीय पुरस्कारही जाहिर करण्यात आला. मिळालेल्या या यशानंतर, यामीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले की, हा तिच्यासाठी अत्यंत खास क्षण आहे आणि हे एक असे स्वप्न होते जे तिने अनेक वर्षांपासून आपल्या हृदयात जपले होते. या सन्मानाबद्दल यामीने आपली संपूर्ण टीम, कुटुंब आणि प्रेक्षकांचे आभार मानले.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा