Headlines

WPI Inflation June 2026; महागाईचा महा-विस्फोट! जूनमध्ये घाऊक महागाई 9.87%, सर्वसामान्यांचे हाल; कोणत्या गोष्टी ठरतायत ‘व्हिलन’?


WPI Inflation Rate June 2026: पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या खिशापर्यंत पोहोचली आहे. जून महिन्यातील घाऊक महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढून 9.87 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मुख्यतः खाद्यपदार्थांच्या किमतींमधील वाढ आणि उत्पादन खर्चावरील दबाव ही महागाई दर वाढीची मुख्य कारणे होती. मात्र इंधन आणि विजेच्या महागाईत काहीसा दिलासा मिळाला.

WPI inflation June 2026
महागाईचा महा-विस्फोट! जूनमध्ये घाऊक महागाई 9.87%(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Wholesale Inflation Rate: महागाईबद्दल चिंता आता दिवसेंदिवस वाढली आहे, ज्याचा पुरावा पुन्हा एकदा आकडेवारीच्या रूपात पाहायला मिळत आहे. जून 2026 मध्ये घाऊक महागाई म्हणजे WPI निर्देशांक मे महिन्यातील 9.68 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 9.87 टक्क्यांवर पोहोचला. अशाप्रकारे, ही महागाई दरवाढ बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त राहिली. तज्ज्ञांना जूनमध्ये घाऊक महागाई सुमारे 9.38% राहणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्ष आकडा यापेक्षा जास्त आला.

महागाई हाताबाहेर गेली

DPIIT म्हणजे सरकारी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या प्रसिद्ध आकडेवारीनुसार, या दरवाढीचे सर्वात मोठे कारण अन्नधान्य महागाई आणि प्राथमिक वस्तू, म्हणजेच कच्ची कृषी उत्पादन आणि इतर प्राथमिक वस्तूंच्या किमतीतील वाढ असल्याचे मानले जाते. इंधन आणि वीज, उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे महागाईने उंच उडी घेतली.

Maharashtra TimesProperty Rights: मुलीच्या वारसांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का? मुलीचा पती, मुलं तिच्या आई-वडिलांचे वंशज होत नाहीत का? नियम वाचा
मध्यपूर्वेतील तणाव नव्याने वाढला ज्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने कळस गाठला. फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याचं नाव घेत नाही परिणामी, महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. याआधी आदल्या दिवशी किरकोळ महागाईचा दर जाहीर केला गेला जो सलग सातव्या महिन्यात 4.38 टक्क्यांवर पोहोचला.

महागाई वाढण्याचे मुख्य कारण काय

इंधन महागाईत घट झाली असली तरीही, वाढत्या अन्नधान्याच्या किमती आणि उत्पादन खर्चाच्या दबावामुळे महागाईचा भडका उडाला. WPI वर आधारित महागाई सलग दुसऱ्या महिन्यात दुहेरी अंकांजवळ राहिली. अन्नधान्याच्या किमती, पेट्रोलियम उत्पादने, मूलभूत धातू आणि रसायने यांच्या किमतीतील वाढ या महागाई वाढीचे मुख्य घटक ठरले.

Maharashtra TimesPF New Rule: नोकरी बदलली तरी थेट ट्रान्सफर होईल पीएफचे पैसे; EPFO च्या नियमात झाला मोठा बदल, कोणाला मिळणार फायदा?
पश्चिम आशियाई संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील प्रभावी नाकेबंदीमुळे घाऊक महागाईतील ही तीव्र वाढ झाली. अशा स्थितीत, अमेरिका-इराणने होर्मुझची वाट रोखून धरली असून होर्मुझ सामुद्रधुनीतून भारत आपल्या कच्च्या तेलाचा बहुतांश भाग आयात करतो, ज्याचा परिणाम अन्न-धान्याच्या किमतींवरही झाला.

दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्या

  • दररोजच्या वापराच्या (प्राथमिक वस्तू) वस्तूंची महागाई 4.99% वरून 7.00% पर्यंत वाढली.
  • अन्नधान्याची महागाई 4.49% वरून 6.14% पर्यंत वाढली.
  • इंधन आणि विजेची घाऊक महागाई 30.33% वरून 27.41% पर्यंत कमी झाली.
  • उत्पादित वस्तूंची घाऊक महागाई 7.48% वर स्थिर राहिली.

Maharashtra TimesGold Silver Price Today: युद्धाच्या तणावात सराफा बाजारात उलटफेर; सोन्याच्या भावात मोठी पलटी, चांदीने फुंकला महागाईचा बिगुल

WPI महागाईचा सर्वसामान्यांवरील परिणाम

दीर्घकाळ टिकणाऱ्या उच्च घाऊक चलनवाढीचा बहुतेक उत्पादक क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे WPI महागाई दर दीर्घकाळ उच्च राहिल्या, तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतील परिणामी, दररोजच्या वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागेल. सरकार केवळ टॅक्सच्या माध्यमातून घाऊक किंमत निर्देशांक नियंत्रित करू शकते.

उदाहरणार्थ, क्रूडच्या तीव्र दर वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले, पण सरकार केवळ एका मर्यादेपर्यंतच कर कपात करू शकते. मेटल, रसायने, प्लॅस्टिक आणि रबर यांसारख्या कारखान्याशी संबंधित वस्तूंना WPI मध्ये अधिक महत्त्व असते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा