Headlines

woman being assaulted on dadar railway station track viral video; दादर स्टेशनच्या रुळावर पुरुषाची भयानक कृती, महिलेसोबत जे केलं ते व्हिडिओत कैद; सोशल मीडियावर संतापाची लाट


Dadar Viral Video : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावरील एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रेल्वे रुळावर जे घडलं ते पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर झाला आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

Dadar Railway Assault, Mumbai Woman Assault
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दादर रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भरदिवसा रेल्वे रुळावर एका महिलेला मारहाण करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार सुरू असताना आजूबाजूला अनेक लोक उभे असले तरी तातडीने कोणीही हस्तक्षेप करताना दिसत नाही. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि मारहाणीमागचं कारण काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत अनेक चर्चा सुरू असल्या तरी अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. भरदिवसा, तेही मुंबईतील दादरसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर अशी घटना घडल्याने अनेकांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

दरम्यान, रेल्वे पोलिसांकडून या व्हिडिओची पडताळणी सुरु असल्याची माहितीही समोर आली आहे. व्हिडिओतील महिला आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीची ओळख, त्यांच्यातील संबंध आणि वादाचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास केला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत रेल्वे पोलिसांकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.

Maharashtra TimesShapoor Zadran Death : क्रिकेटविश्वावर शोककळा, सेहवाग-गंभीरला बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाजाची 38 व्या वर्षीच एक्झिट

तसेच, हा व्हिडिओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, तो पूर्ण आहे की त्यातील काही भागच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, याचीही खात्री झालेली नाही. त्यामुळे व्हायरल व्हिडिओच्या आधारे कोणताही निष्कर्ष सध्या पुढे आलेला नाही. तपासानंतरच या संपूर्ण प्रकरणाचं खरं चित्र समोर येणार आहे.

आता रेल्वे पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या घटनेमागचं नेमकं सत्य उघड होण्याची शक्यता आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच महिलेला मारहाण करण्यामागचं कारण आणि पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा