Headlines

volkswagen plans major restructuring up to 100000 job cuts four german plants may shut; ऑडी, पोर्शे कार उत्पादक कंपनीत महाभूकंप, 1 लाख कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात; कारखान्यांनाही टाळं लागणार?


Volkswagen Layoffs News: फोक्सवॅगनमध्ये मोठ्या कर्मचारी कपातीची तयारी सुरू झाली आहे. तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर महत्त्वाचे मानले जाणारे चार कारखानेही बंद होऊ शकतात, अशी माहितीही आता समोर आली आहे.

volkswagen job cuts
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जागतिक ऑटोमोबाईल जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. वाहन उत्पादक कंपनी ‘फॉक्सवॅगन’ सध्या एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून, कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी पुनर्रचना करण्याची तयारी सुरू आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनी तब्बल १ लाख कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याच्या तयारीत आहे. इतकंच नाही तर जर्मनीतील काही प्रमुख कारखानेही कायमचे बंद केले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ‘मॅनेजर मॅगझिन’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

किती कर्मचारी कपात होणार?

ऑडी, पोर्शे आणि फॉक्सवॅगन सारखे एकापेक्षा एक ब्रँड्स असलेल्या या समूहात सध्या जगभरात सुमारे ६ लाख ५७ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीने यापूर्वी २०३० पर्यंत ५० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता परिस्थिती आणखी बिघडल्याने हा आकडा थेट १ लाखांवर नेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुढील महिन्यात कंपनीच्या बैठकीत या प्रस्तावावर अंतिम चर्चा होणार आहे. मात्र, कंपनीत कामगारांचा विरोधाच्या दृष्टीने या निर्णयात काही बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बड्या कारखान्यांवर टांगती तलवार

कंपनीने खर्च कमी करण्यासाठी केवळ कर्मचारी कपातच नाही, तर जर्मनीतील चार मोठे उत्पादन प्रकल्प बंद करण्याचाही आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑडीचा नेकार्सुल्म येथील प्रकल्प, तसेच फॉक्सवॅगनच्या हॅनोव्हर, झ्विकाऊ आणि एम्डेन येथील कारखान्यांचा समावेश आहे. याशिवाय, वाहनांचे सुटे भाग बनवणारा व्यवसाय आणि फॉक्सवॅगन हा मुख्य ब्रँड पूर्णपणे वेगळा करण्याचा विचारही कंपनी करत आहे. कारण, गेल्या काही वर्षांत या ब्रँडकडून पाहिजे तितका नफा मिळालेला नाही.

Maharashtra Times8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या हालचाली अंतिम टप्प्यात; पगारवाढीत सरकारच अडसर ठरणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे संकेत

फॉक्सवॅगनवर ही वेळ का आली?

एकेकाळी ऑटो विश्वावर राज्य करणाऱ्या फॉक्सवॅगनवर ही वेळ येण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. अमेरिकेने लावलेल्या कडक आयात शुल्कामुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे, तर दुसरीकडे चीनच्या बाजारपेठेत फॉक्सवॅगनच्या गाड्यांची मागणी कमालीची घटली आहे. यातच युरोपच्या बाजारात BYD आणि स्टेलांटिस सारख्या कंपन्यांनी फॉक्सवॅगनला जोरदार टक्कर दिली आहे. या वाढत्या आर्थिक दबावामुळेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर ब्लूम यांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच कंपनीने आपल्या एव्हरलन्स या सागरी इंजिन व्यवसायातील ५१ टक्के हिस्सा विकला आहे.

कामगार संघटनांसोबत जोरदार संघर्ष?

फॉक्सवॅगनच्या या प्रस्तावामुळे कामगार संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून त्यांनी याला जोरदार विरोध केला आहे. कंपनीच्या मंडळात निम्मे सदस्य हे कामगारांचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे हा प्रस्ताव सहजासहजी मंजूर होणार नाही, हे स्पष्ट आहे. दरम्यान, फॉक्सवॅगनने या वृत्तातील आकड्यांवर थेट भाष्य करण्यास नकार दिला असला, तरी भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नव्या आणि कडक आराखड्यावर काम सुरू असल्याची कबुली दिली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा