Virar search operation for children who fell into sea negligence of police warning; पोलिसांनी समजावलं, तरीही चार मुलं समुद्रात उतरली; दोघांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता
Virar search operation for children who fell into sea negligence of police warning; पोलिसांनी समजावलं, तरीही चार मुलं समुद्रात उतरली; दोघांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता
अमुलकुमार जैन, विरार: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. समुद्रात उतरू नका, असा इशारा पोलिसांनी देऊनही चार अल्पवयीन मुले समुद्रात उतरली आणि काही क्षणांतच प्रचंड लाटांच्या विळख्यात अडकली. पोलिस व होमगार्ड जवानांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उड्या घेत दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले, परंतु अन्य दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेतील १४ ते १७ वयोगटातील ही चार मुले गुरुवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास अर्नाळा समुद्रकिनारी आली होती. किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी आणि होमगार्ड जवानांनी त्यांना पावसाळ्यात समुद्र धोकादायक असल्याचे सांगत पाण्यात उतरू नये, असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यानंतर गस्त पथक पुढे निघून गेले. मात्र, पथक निघताच मुलांनी पुन्हा समुद्रात प्रवेश केला.
काही वेळातच समुद्राच्या उंच लाटांनी चौघांनाही वेढले. स्वतःला सावरता न आल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकताच पोलिस आणि होमगार्ड जवानांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उड्या घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, उर्वरित दोघांना समुद्राच्या प्रचंड लाटांनी आत खेचल्याने ते बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस, अग्निशमन दल, जीवरक्षक, सर्च क्लब आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली.
दरम्यान, अर्नाळा समुद्रकिनारी ३० सप्टेंबरपर्यंत समुद्रात उतरण्यास बंदी आदेश लागू आहे. याबाबतचे इशारे देणारे फलकही समुद्रकिनारी लावण्यात आले आहेत. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने पर्यटक आणि नागरिकांना पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. खवळलेल्या समुद्रात उतरणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे बंदी आदेशांचे काटेकोर पालन करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा