Headlines

Vasai Virar Rain Update Residents troubled with No Mobile Internet WiFi Drinking Water; पाणी साचलंय, पण प्यायला नाही; वसई-विरारवासियांचे ‘पाऊस’हाल, चार्जिंग-वायफाय ठप्प, WFH करणाऱ्यांची कोंडी


Palghar Rain Update : नालासोपारा आणि वसई-विरारच्या पूरग्रस्त भागांत दूध, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली आहे.

Vasai Virar Nalasopara Rain Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वैष्णवी राऊत, वसई : वसई-विरार उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून केवळ रस्तेच पाण्याखाली आणले नाहीत, तर हजारो कुटुंबांचे आयुष्यही अंधारात ढकलले आहे. सोमवारी सुरू झालेली पूरस्थिती दुसऱ्या दिवशी अधिकच गंभीर झाली. सखल भागात साचलेले पाणी, घरात शिरलेले मैलापाणी आणि सलग तिसऱ्या दिवशीही गायब झालेली वीज यामुळे स्थानिकांचे जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे.

दूध-भाजीपाल्यांचं नुकसान

घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच नालासोपारा आणि वसई-विरारच्या पूरग्रस्त भागांत दूध, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ओढाताण होत असल्याची प्रतिक्रिया नालासोपाऱ्यातील अलका पाटील यांनी दिली.
Maharashtra TimesMuskan Jain : प्लीज माझे प्रायव्हेट फोटो डिलीट कर, तरुणीची रडत विनवणी; ऑडिओ क्लीपने अख्खी केस पालटली, युगुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

तीन दिवस विजेविना

वसई पश्चिमेकडील सनसिटी येथील मुख्य वीज उपकेंद्र मंगळवारी पाण्याखाली गेल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. खबरदारीचा उपाय म्हणून आणि तांत्रिक बिघाडामुळे महावितरणला अनेक भागांचा वीजपुरवठा तातडीने बंद करावा लागला. वसई सनसिटी, गास, निर्मळ, नालासोपारा शहर आणि विरारमधील काही भागांतील नागरिकांना सलग तीन दिवस विजेविना काढावे लागत आहेत.

Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेत ₹1500 ऐवजी ₹2100? PM- EACची शिफारस

पाणी साचलंय, पण प्यायला नाही

‘घरात पाणी साचले आहे, प्यायला पाणी नाही आणि चार्जिंग नसल्यामुळे कोणाशी संपर्कही करता येत नाही. आम्ही जगापासून पूर्णपणे तुटलो आहोत’, अशी प्रतिक्रिया नालासोपाऱ्यातील संजय घरत यांनी दिली. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा, महावितरण विभाग किती तकलादू आहेत, हे या पुरामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.
Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढे स्वतः याच्या गाडीवर चायनिज खातात; मराठी नाटकाला ताज्या घडामोडींचा संदर्भ, निखिल चव्हाणचा डायलॉग चर्चेत

इंटरनेट ठप्प; ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांची कोंडी

अंधाराबरोबरच नागरिकांना दुसऱ्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे, ती म्हणजे मोबाइल आणि इंटरनेटसेवा. वीज नसल्यामुळे स्थानिक इंटरनेटसेवा पुरवठादार आणि मोबाइल टॉवर्सचे बॅकअप संपले असून, इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रात सक्रिय असलेल्या आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. वीज आणि इंटरनेट दोन्ही गायब झाल्यामुळे त्यांचे कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा