Headlines

वाढवण बंदराजवळ आंतरराष्ट्रीय बाजार, दापचारीमध्ये कृषी व्यापार केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय| Maharashtra Times


म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वाढवण बंदरापासून ४० किलोमीटरवर होऊ घातलेल्या या बाजारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.

‘देशांतर्गत, तसेच निर्यात बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करणारे जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र म्हणून या बाजाराची उभारणी केली जाईल,’ असे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. हा प्रकल्प फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्लोरा हॉलंड, तसेच रॉटरडॅम बंदर परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesMumbai AC Local: एसी लोकल दररोज विलंबाने, जादा भाडं भरूनही प्रवाशांचे हाल; तिकीटाच्या एका तासाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

‘राज्यात आंतरराष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अशी त्रिस्तरीय विपणन व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यातून कृषीमालाच्या मूल्यसाखळीला बळकटी मिळणार आहे. निर्यात बाजार सुविधांचे एकत्रीकरण, काढणीनंतरचे मूल्यवर्धन, संगणकीकृत, तसेच पारदर्शक व्यवहार आणि आधुनिक बाजार पायाभूत सुविधा यावर विशेष भर दिला जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

एकाच केंद्रात सहा महत्त्वाच्या सुविधा

दापचरी येथील केंद्रामध्ये घाऊक व्यापार, आयात-निर्यात सुविधा, शीतसाखळी व्यवस्था, श्रेणीकरण आणि पॅकेजिंग, मल्टिमॉडेल लॉजिस्टिक व्यवस्था, तसेच ॲग्रिटेक आणि एक्स्चेंज सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत. याशिवाय गोदामे, शीतगृह, फळ पिकवण्याचे केंद्र, गुणवत्ता परीक्षण सुविधा, कंटेनर टर्मिनल, रेल्वे सायडिंग, ई-लिलाव व्यवस्था आणि निर्यात सुलभता केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. “आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार हा प्रकल्प महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य कृषी निर्यात केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल. हा केवळ बाजार नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडणारा विकासाचा नवा मार्ग आहे,” जयकुमार रावल, पणन मंत्री

Maharashtra TimesWeather Alert: महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

फ्रान्सच्या धर्तीवर बाजारपेठ

फ्रान्सच्या रुंगिस येथील बाजारपेठेच्या धर्तीवर दापचरीमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ विकसित केली जाईल.पॅरिसच्या दक्षिणेस फक्त 7 किमी अंतरावर स्थित, रुंगिस इंटरनॅशनल मार्केट (मार्चे इंटरनॅशनल डी रुंगिस) ही जगातील सर्वात मोठी अन्न आणि ताज्या उत्पादनांची बाजारपेठ आहे. 234 हेक्टरवर पसरलेले, हे एका शहराच्या आत एक शहर म्हणून कार्य करते.

“दापाचरीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या दापचरी डेअरी प्रकल्प आहे . वाढवण बंदर दापाचरीपासून खूप जवळ आहे. हा भाग कृषी क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. हे प्रसिद्ध डहाणू चिकू आणि आंब्यासाठी प्रसिद्ध आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पालघर नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेला लागून आहे आणि गुजरात आणि दादरा आणि नगर हवेलीच्या सीमेवरही आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत