Virat Kohli News : सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने स्वतःच्या तयारीवर आत्मविश्वास ठेवला. माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्यामागचा एक खास किस्सा उलगडला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : विराट कोहलीला जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानलं जातं. अनेक वर्षांच्या अनुभवातून त्याने स्वतःची तयारी आणि खेळाची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे खराब फॉर्म असो किंवा दीर्घ विश्रांतीनंतरचे पुनरागमन, कोहली क्वचितच आपल्या खेळापासून दूर राहतो. भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी विराटच्या याच आत्मविश्वासाचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्यांच्या मते, कठीण काळातही कोहली स्वतःच्या क्षमतेवर अढळ विश्वास करतो.
दोन शून्यांनंतर सल्ला नाकारला
अभिषेक नायर यांनी ‘गुगलीज’ या कार्यक्रमात सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी त्यांनी विराटला सर्व काही ठीक आहे का आणि काही चर्चा करायची आहे का, असे विचारले. मात्र कोहलीने शांतपणे, “सगळं ठीक आहे. हा खेळाचा भाग आहे,” असे उत्तर दिले. नंतर नायर यांनी काही निरीक्षण सांगण्याची इच्छा व्यक्त केली, पण विराटने हसतच, “मी माझ्या पद्धतीने यातून बाहेर पडेन, मी पाहून घेतो” असे सांगत सल्ला घेण्यास नकार दिला.
नायर यांच्या मते, विराटने केवळ बोलूनच नाही तर कृतीतूनही स्वतःवरील विश्वास सिद्ध केला. पुढील सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 74 धावांची खेळी करत दमदार पुनरागमन केले. नायर म्हणाले, महान खेळाडू कठीण परिस्थितीत नेमकं काय करायचं हे जाणतात. म्हणूनच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याविषयी त्यांच्या मनात विशेष आदर आहे.
रोहित-विराट संघाला देतील आत्मविश्वास
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराटने 5, तर रोहित शर्माने 11 धावा केल्या. दोघेही मोठी खेळी करू शकले नसले तरी भारताने सामना सहा विकेट्सने जिंकला. नायर यांच्या मते, रोहित आणि विराट यांचा अनुभव भारतीय संघासाठी मोठी ताकद आहे. त्यांची उपस्थिती ड्रेसिंग रूममधला आत्मविश्वास वाढवते आणि उर्वरित खेळाडूंवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे उर्वरित वनडे सामन्यांत दोघेही मोठी खेळी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा