Headlines

Viraj Jagtap : ‘बॅग घेऊन जायचं, परत यायचं नाही’, विराज जगतापवर भडकलेले सचिन गोस्वामी, अभिनेत्यानं सांगितला किस्सा


Viraj Jagtap On Sachin Goswami : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर सचिन गोस्वामी विराज जगतापवर भडकले होते. अभिनेत्यानं हा प्रसंग एका मुलाखतीमध्ये सांगितलाय.

Viraj Jagtap On Sachin Goswami
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं अनेक नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार आता मोठ्या पडद्यावर काम करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे विराज जगताप . मराठी अभिनेता विराज जगतापला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं प्रसिद्धी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला. हास्यजत्रेत येण्यापूर्वी विराजनं अथक परिश्रम केले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विराजनं त्याच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितलं आहे. तसंचं अभिनेत्यानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरीलही किस्सा सांगितला आहे.

विराज जगतापनं सांगितला प्रसंग

विराज हास्यजत्रेत अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी तिथेच असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचा. त्यावेळी त्याला कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्याकडून ओरडा पडलेला. याबद्दल बोलताना विराज म्हणाला की, ‘मला सचिन गोस्वामी सरांकडूनच ओरडा मिळाला होता. म्हणजे चालू शूट थांबलं होतं. आर्ट डिपार्टमेंटनं परस्पर काही गोष्टी ठरवल्या आणि एक सेटवरची गोष्ट काढून टाकली आणि मला त्याबद्दल कल्पना दिली नाही. शूट सुरू झाल्यानंतर सरांना ते दिसलं नाही, मग सरांनी मला विचारलं. मी म्हटलं की, मलाही माहीत नाही. मग मी आर्ट डिपार्टमेंटशी बोललो. त्यांनी मला जे सांगितलं ते मी सरांना सांगितलं, त्यानंतर ते माझ्यावर खूप भडकले की, आपलं काम आहे, परस्पर ठरवायचं नाही लक्ष ठेव वगैरे, तेव्हा मी नवीनच होतो.’

Maharashtra TimesMehmood Son Lucky Ali : मेहमूद यांचा मुलगा, मीना कुमारींचा भाचा, ३ लग्न अन् घटस्फोट, नाही मिळालं खरं प्रेम; स्वतःच्या गाण्यानं चाहत्यांना लावतोय वेड
‘सर तेव्हा मला खूपच ओरडले होते. इतके की, प्राजक्ता माळीनं माझ्या खांद्यावर हात ठेवून माझं सांत्वन केलं होतं. सर म्हणाले की, पुन्हा जर असं झालं तर बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही. असं खूप ओरडले होते, त्यानंतर रूममध्येही खूप बडबड केली. त्या दिवशी मी जेवलोसुद्धा नाही, पूर्ण दिवस निराश होतो. सेटवर इतक्या लोकांसमोर मला ओरडले म्हणून मला वाईट वाटत होतं.’ असं विराजनं शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराज जगताप बोलत होता.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

याच मुलाखतीदरम्यान विराजनं त्याच्या आयुष्यातील संघर्षकाळही सांगितला आहे. कॉलेज संपल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातच करिअर करण्यासाठी त्यानं धडपड केली. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती अधिक खालावल्यानंतर त्यानं पार्ट टाईम नोकरी केली. त्या नोकरीच्या पगारातून अभिनेता उदरनिर्वाह करत होता. त्यानंतर विराजला हास्यजत्रा मिळाली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा