Headlines

Vidhan Parishad Election 2026 Result Parbhani Eknath Shinde led Shiv Sena Saeed Khan won; ठाकरेंना डिवचणाऱ्या शिंदेंचाही परभणीत ‘खान’ आमदार, विधान परिषेदवर झेंडा फडकवला


Maharashtra MLC Election Result 2026 : परभणी जिल्हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पण याच किल्ल्याला शिंदेंनी भगदाड पाडले आहे. परभणीत ठाकरेंनी मुस्लिम महापौर दिल्यानंतर ‘खाना’ला निवडून आणलं, अशी टीका करणाऱ्या शिवसेना-भाजपने आता मुस्लिम व्यक्तीलाच विधान परिषदेची उमेदवारी देत निवडूनही आणल्याचं पाहायला मिळत आहे.

Parbhani Saeed Khan Vidhan Parishad Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या सईद खान यांनी तब्बल 465 पैकी 242 पहिल्या पसंतीची मते घेत दणदणीत विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डॉक्टर विवेक नावंदर यांना 169 मतांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना केवळ 56 मध्येच मिळाली आहेत. परभणी जिल्हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पण याच किल्ल्याला शिंदे गटाने भगदाड पाडले आहे. परभणीत ठाकरेंनी मुस्लिम महापौर दिल्यानंतर ‘खाना’ला निवडून आणलं, अशी टीका करणाऱ्या शिवसेना-भाजपने आता मुस्लिम व्यक्तीलाच उमेदवारी देत निवडूनही आणल्याचं पाहायला मिळत आहे.

तिरंगी लढतीमुळे चुरस

परभणी हिंगोली विधान परिषदेची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत आली होती. महायुतीकडून ही जागा शिवसेनेला सुटली. त्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे दिली. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. पण या विधानपरिषद मतदारसंघामध्ये महायुतीकडे प्रचंड बहुमताचा आकडा होता, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असे सुरुवातीला वाटत नव्हते. पण त्यातच अपक्ष उमेदवारांनी एन्ट्री घेतल्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली. तिरंगी झालेल्या या लढतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सईद खान यांचा दणदणीत विजय झाला आहे.

466 जणांपैकी या निवडणुकीमध्ये 465 मतदारांनी मतदान केले त्यापैकी 242 पहिल्या पसंतीची मते ही शिवसेना शिंदे गटाच्या सईद खान यांना मिळाली आहेत. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांना 159 मते मिळाली आहेत तर तिसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना केवळ 56 मते मिळाली, तर आठ मते बाद झाली. महायुतीकडे तब्बल 300 च्या वर मतदार असताना देखील सईद खान यांना केवळ 242 मते मिळाल्याने महायुतीमध्ये देखील कुठेतरी मतांचे विभाजन झाले असल्याचे आता समोर आलेले आहे. असे असले तरी महायुतीचा विजय झाल्यामुळे जिल्हाभरात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सध्या जल्लोष करत आहेत.
Maharashtra TimesGokul Gite : नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?

उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला आता एकनाथ शिंदेंचा होणार?

परभणी जिल्हा हा आजपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक खासदार आणि एक आमदार निवडून दिला. त्यामुळे राज्यामध्ये जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले तरी परभणी जिल्ह्यामध्ये मात्र त्यांना यश मिळत नव्हते.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यश खेचून आणले आहे. सईद खान यांच्या रुपाने त्यांचा पहिला शिवसेनेचा आमदार म्हणून विजयी झालेला आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाला दुसरी लॉटरी देखील लागलेली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत आता एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परभणी जिल्हा हा शिवसेना म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला होणार का असा प्रश्न मात्र आता पडला आहे.

ठाकरेंचे उमेदवार गणेश लोखंडे पराभूत; भाजपच्या सुहास शिरसाठ यांचा दणदणीत विजय

सईद खान यांच्या रूपाने अल्पसंख्याक आमदार नेतृत्व

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा एल्गार केला. भाजपच्या हिंदुत्वासोबतच एकनाथ शिंदे यांनी आपलं देखील हिंदुत्व कडवं असल्याचं जाहीर केलं. उद्धव ठाकरे यांना काँग्रेससोबत गेल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना मुस्लिमांना गोंजारावं लागत आहे असं देखील म्हटले गेले पण त्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे मुस्लिम मते वळवण्यासाठी एका अल्पसंख्याक उमेदवाराला परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून देखील आणलं आहे.
Maharashtra TimesBhaskar Jadhav : मिलिंद नार्वेकर एवढे हळवे आहेत माहिती नव्हतं, भास्कर जाधवांची सारवासारव, राहुल नार्वेकर समजून विधान केल्याचा दावा
येणाऱ्या काळामध्ये मुस्लिमांची मतही केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ती मर्यादित न राहता महायुतीला देखील मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सईद खान यांच्या रूपाने अल्पसंख्याक नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यापुढे ठेवल्यामुळे राज्यातील मुस्लिम मतदार देखील आता त्यांच्या पाठीमागे जाणार का हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा