Headlines

Vasai 60 Year Old Woman Killed After Breaking into her House; आई फोन उचलेना, लेकाची चिंता वाढली, घरी जाऊन पाहिलं तर…; वसईमध्ये नेमकं काय घडलं?


Vasai Crime News : बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आलं होतं. सध्या पोलिसांनी पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Vasai Crime News
वसई महिलेची घरात घुसून हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर : पालघर जिल्ह्यातील वसई शहरातील बऱ्हाणपूर उमेळमान गावात एका 60 वर्षीय महिलेची राहत्या घरात घुसून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘भिमाई’ नावाच्या बंगल्यात एकट्याच राहणाऱ्या दुर्गा संजयराव बनसोडे (वय 60) यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा बनसोडे या एकट्याच राहत होत्या, तर त्यांचा मुलगा वालीव येथे वास्तव्यास होता. काल सोमवारी सकाळपासून आई दुर्गा त्यांचा फोन उचलत नसल्यामुळे मुलाला संशय आला. रात्री घरात प्रवेश केला असता हॉलमध्ये रक्ताचे डाग दिसून आले आणि घाबरलेल्या भावाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी बेडरूममध्ये मृतदेह आढळल्याची नोंद केली.

नेमकं काय घडलं?

गुन्ह्याचे स्वरूप पाहता, बेडवरील गादी काढून बेड उघडलेला होता आणि बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावलेले होते. या बाबींवरून हा गुन्हा नियोजनपूर्वक करण्यात आलेला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेहावर झालेली जखम आणि घरातील परिस्थिती यावरून हत्येची भयंकर रूपरेषा दिसून येते. सध्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घरातून काही चोरी झाली आहे का? याची पडताळणी कुटुंबीयांकडून सुरू असून, पुढील तपासात अधिक माहिती स्पष्ट होईल. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांची चौकशी आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याची कामे सुरू आहेत.
Maharashtra TimesKolhapur Crime : दीड महिन्यापूर्वी पतीचं निधन, पत्नीचा बेडरुममध्ये संशयास्पद मृत्यू, कोल्हापुरात खळबळ, घातपाताच्या चर्चा

रहस्यमय हालचालींनी थरारक रहस्य

वसईतील ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेवर याप्रकारे हल्ला होणे चिंताजनक असून, गुन्हेगार लवकरात लवकर अटक व्हावी, यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, घटनास्थळासमोरील रहस्यमय हालचालींनी थरारक रहस्य अधिक समोर येणार आहे. या प्रकरणातून घरातील सुरक्षा, एकट्याच राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई याबाबत प्रशासनास सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा