Vandana Gupte Bond With Raj Thackeray And Sharmila Thackeray : अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरी पासून ते लग्नापर्यंतचे धमाल किस्से शेअर केलेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिनेत्री वंदना गुप्ते या मराठी इंडस्ट्री मधल्या हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अगदी झोकून अभिनय केला आहे. त्यांच्या नाटकांना आजही नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल चे बोर्ड पाहायला मिळतात. एक अभिनेत्री म्हणून कला विश्वात त्यांच्या अनेक ओळखी आहेत पण राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशी सुद्धा त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. वंदना गुप्ते यांनी नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत चे बालपणीचे किस्से तसेच राज ठाकरेंसोबतच्या आठवणी शेअर केल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या दिग्दर्शक अभिनेते मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. वंदना गुप्ते आणि शर्मिला या बालपणी एकाच सोसायटीत राहायच्या त्यामुळे त्यांच्यात उत्तम मैत्री होती. वंदना गुप्ते म्हणाल्या की शर्मिला अगदी लहान असल्यापासून मला ओळखते. तिला गाडी सुद्धा चालवायला मीच शिकवली होती. एकदा ती मला म्हणाली होती की वंदू ताई चल ना तुझी गाडी काढ मला गाडी चालवायची आहे. मग मी तिला म्हटलं बस गाडीत चल जाऊ … त्यावेळी माझ्याकडे अँबेसिडर गाडी होती. ती ड्रायव्हर सीटवर बसलेली. मी तिला क्लच, गिअर या सगळ्याची माहिती दिली. मग आम्ही गाडी बाहेर काढली आणि रूपारेल कॉलेजच्या दिशेने निघालो. तिथे पुढे असलेल्या एका पोलीस हवालदाराने आम्हाला पाहिलं. शर्मिला त्यावेळी अगदी तेरा वर्षाची वगैरे होती. तेव्हा चालत्या गाडीत आम्ही सीट बदलल्या होत्या.
Twinkle Khanna On Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंमुळे वाढलं ट्विंकल खन्नाचं काम, आता घरीच बनवावं लागतंय पनीर, आईसोबतच्या मजेशीर भांडणाचा किस्सा शेअर त्यावेळी त्या हवालदाराला शिट्टी मारायची की आम्हाला थांबायचं हेच कळत नव्हतं. मग आम्ही त्या हवालदाराच्या इथे थांबलो. त्या हवालदाराच्या शर्टवर त्याचं नाव पाटील असं लिहिलेलं त्यामुळे मी त्यांना काय पाटील कसं काय म्हणून विचारलं. ते मला म्हणाले की, तू कशी मला ओळखतेस? मी मुद्दाम म्हणाले की, तुम्ही तर इथे रोज असता. तेव्हा ते हवालदार म्हणाले की मगाशी तर तू बाजूच्या सीटवर बसलेलीस आणि ही मुलगी गाडी चालवत होती ना. पण मी त्यांना नकार देत म्हटलं की कसं काय शक्य आहे! ही तर तेरा वर्षांची आहे. तिच्याकडे लायसन सुद्धा नाही मग ती कशी गाडी चालवेल. असं करून मी तिला त्या हवालदाराच्या संशयातून सोडवलं होतं.
Nikki Tamboli Arbaz Patel Breakup : निक्की तांबोळीकडून अरबाज पटेलची नात्यात फसवणूक? पोस्टमधून सांगितलं चिटिंगचं कारण, कपलने सोशल मीडियावरही एकमेकांना केलं अनफॉलो वंदना गुप्ते यांनी राज ठाकरे यांचा सुद्धा किस्सा शेअर केला. त्या म्हणाल्या की राज आणि शर्मिलाचे प्रेम प्रकरण सुरू होतं. मोहन वाघ त्यावेळी सोसायटीच्या गेटवर उभे होते की शर्मिला अजून इतका वेळ झाला तरी कुठे गेली? त्यावेळी माझा तिथे काही संबंध नव्हता मी कुठेतरी चालले होते. शर्मिला माझ्या मागून आली आणि मला गपचूप म्हणाली, वंदू ताई मी तुझ्यासोबत येते. मग मी म्हटलं चल मला काही प्रॉब्लेम नाही.. पुढे जाऊन मोहन वाघ यांनी आम्हाला विचारलं की कुठे होता तेव्हा मी त्यांना खोटं सांगितले की इथेच कुल्फी खायला गेलेलो. मोहन वाघे यांचा त्यांच्या मुलींवर बारीक लक्ष असायचं.
वंदना गुप्ते यांची संपूर्ण मुलाखत
थोड्या दिवसांनी मला राज आणि शर्मिला मध्ये काय चालू आहे त्याबद्दल समजलं. मग मी त्यांच्या चिठ्ठ्या वगैरे पोहोचवल्या होत्या. त्यांच्या लग्नात तर आम्ही खूप धमाल केली होती. राजचा मित्र आणि मी मिळून मुद्दामून त्यांच्या रूम मध्ये पापड ठेवलेले, वेगवेगळ्या ठिकाणी गजर लावलेले असा खूप सतावलेलं त्यांना. मी अशी मिश्किल होते… माझा त्या मिश्किल पणाचा खूप फायदाही घेतला गेला.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा