Usha Nadkarni on Lifetime Cchievement Awards:मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या कसदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ८० वर्षांच्या असूनही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई:सिनेइंडस्ट्रीत असे अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत, जे वयाच्या ७०-८० व्या वर्षीही प्रचंड सक्रिय आहेत. मालिका, सिनेमे, नाटकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशाच एक अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री उषा नाडकर्णी . वयाच्या ८० व्या वर्षीही त्या सिनेमा, मालिकांमध्ये तितक्याच उत्साहानं काम करत आहेत. तर अनेक कार्यक्रमांनाही त्या हजेरी लावताना दिसतात. त्यांचा हा उत्साह नवख्या , तरुण कलाकारांनाही लाजवेल असाच आहे. त्यांना आतापर्यंत अनेक मोठ्या अन् मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय, पण त्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार नाकारतात, त्या मागचं कारही उषा यांनी सांगितलंय.
उषा नाडकर्णी यांनी ‘लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार नाकारण्यामागचं कारण सांगितलं. . ‘पवित्र रिश्ता’ मधील सविता देशमुख असो किंवा इतर मराठी चित्रपट व मालिकांमधील त्यांच्या भूमिका असोत, प्रेक्षकांनी त्यांच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. अलीकडंच दिलेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी आपण ‘लाइफटाइम अचिव्हमेंट’ (जीवनगौरव) पुरस्कार का स्वीकारत नाही, याविषयीचा खुलासा केला आहे.
“माझं वय फक्त वाढलंय, मी म्हातारी झालेली नाही”
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान उषा नाडकर्णी म्हणाल्या की, मीलाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डअजिबात स्वीकारणार नाही. लोकांना आणि पुरस्कार देणाऱ्यांनाही ठाऊक आहे की मी थांबणार नाही आणि काम करतच राहणार आहे! तसंही माझ्या घरात पुरस्कार ठेवायला अजिबात जागा उरलेली नाही. मी म्हातारी झालेली नाही; फक्त माझं वय वाढलं आहे. मला अजूनही भरपूर काम करायचं आहे. वाट्याला आलेलं प्रत्येक काम करत असताना आपल्या अभिनय प्रवासाची नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे असा दृष्टिकोन बाळगून काम करत असल्यानं जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्याची त्यांची सध्या तरी कोणतीही इच्छा नाहीये, असंही त्या म्हणाल्या.
आपल्या वैयक्तिक व आर्थिक संघर्षावर बोलताना उषा नाडकर्णी यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिलं घर वयाच्या ७० व्या वर्षी खरेदी केलं. कर्जाच्या भीतीनं त्यांनी आधी घर घेण्याचं धाडस केलं नव्हतं. मला नेहमी भीती वाटायची की जर कर्जाचे हफ्ते बाकी असताना मला काही झालं, माझा मृत्यू झाला, तर लोक म्हणतील की ही डोक्यावर कर्ज ठेवून गेली. मराठी मनोरंजन सृष्टीत मानधन कमी मिळायचं. माझी या क्षेत्रातील पहिली कमाई अवगी २५ रुपये होती, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
मी बिग बॉसमध्ये पुन्हा अजिबात जाणार नाही; उषा नाडकर्णी यांनी सांगितलं कारण
तर सध्या नवीन कलाकारांनाही मॅनेजर असतात. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, स्वतःच्या अटींवर आणि कष्टावर विश्वास असल्यानं कधीही पीआर किंवा मॅनेजर ठेवला नाही. आपल्या पालकांप्रमाणेच त्यांनी हिशोब ठेवणं किंवा प्रसिद्धीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणं टाळलं. कष्टावर विश्वास ठेवला तर काम देणारे स्वतः शोधत येतात, यावर त्यांचा विश्वास आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा