US Iran Peace Deal MOU : डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

अखेर संघर्ष संपुष्टात…
एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान अमेरिका-इराण कराराच्या कागपत्रांवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रती इराण आणि मध्यस्थ देशांना पाठवण्यात आल्या आहेत. यापूर्वी रविवारी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे मुख्य वाटाघाटीकार, मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने दोन्ही देशांमधील जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.
US Iran Peace Deal: ट्रम्प यांचा दावा फुसका! US-इराण करारात अखेरच्या क्षणी गेम; होर्मुझचा विषय जगाला ‘महागात’ पडणार
‘इराणकडे कधीही अणुशस्त्र असू नये’
तात्पुरत्या शांतता कराराला पाठिंबा देण्याचा निर्णय स्पष्ट करताना, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, ‘इराणकडे कधीही अणुशस्त्र असू नये’. त्याचवेळी, त्यांनी असही सुचवलं की, ‘तेहरान युरेनियम संवर्धनाची क्षमता कायम ठेवू शकेल, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा विकास सुरू ठेवू शकेल आणि यापूर्वी गोठवलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या मालमत्तेचा ताबा पुन्हा मिळवू शकेल’, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
गेल्या 24 तासांत काय-काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यामते युद्धाला थांबा देणं, होर्मुजला परत उघडणं आणि इराणला परमाणु शस्त्रापासून रोखणं हे आमचं ध्येय होतं, जे आता पूर्ण झालं आहे.
‘जर इराणने अमेरिकेसोबत झालेल्या कराराचं उल्लंघन केलं, तर आम्ही पुन्हा युद्धाला सुरुवात करु’, असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही इराणला परमाणू शस्त्र मिळू देणार नाही’, अशी भूमिकाही त्यांनी घेतलीय.
US Iran Peace Deal Explained: अमेरिका-इराणमध्ये शांतता करार, फक्त स्वाक्षऱ्या बाकी; तेवढ्यात इस्रायलची स्पष्टोक्ती, ‘आम्ही लागू करणार नाही!’
‘अमेरिका-इराण यांनी युद्धाबाबत घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक केलं पाहिजे’, असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे.
CNNच्या रिपोर्टनुसार अमेरिका-इराणने केलेल्या सामंजस्य करारात युद्ध थांबवणे, होर्मुज खाडी उघडणे, तेल निर्यात आणि अडकलेला पैसा अशा 14 मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे.
UK Social Media Ban: सोळा वर्षांखालील मुलांना ब्रिटनमध्येही ‘सोशल’बंदी; अॅप वापरावर निर्बंधाची पंतप्रधान स्टार्मर यांची घोषणा
‘300 अरब डॉलरच्या पॅकेजच्या बातम्या खोट्या आहेत. जर इराणला सर्व अटी मान्य असतील, तर दूसरे देश पैसा अडकवू शकतात. पण अमेरिका पैसा नाही देणार’, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे.

