Headlines

Jalgaon Takli Two Month Old Girl Dies after being Vaccinated Hospital Refuses to keep Body in Morgue; जवानाच्या चिमुकलीची बॉडी शवागृहात घेण्यास रुग्णालयाचा नकार, आजोबांनी नातीला मांडीवर घेत काढली रात्र; जळगावात संतापजनक प्रकार


Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस मोठमोठ्या घटना घडत आहेत. याचदरम्यान, जळगावमधील चाळीसगावात संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका अडीच महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.

Buldhana Daughter Wedding Father Dies of Heart Attack
जळगाव टाकळी लसीनंतर मुलीचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथे लसीकरण झाल्यानंतर एका अडीच महिन्याच्या चिमुकलीचा घरी पोहोचताच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात बालिकेचं पार्थिव आणल्यावर त्याला शवागृहात ठेवण्यास नकार देण्यात आल्यानं चिमुकलीचं पार्थीव मांडीवर ठेवून आजोबांनी रात्र काढली. ही धक्कादायक घटना लसीकरण करण्यात आल्यानंतर घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील जिल्हा परिषद शाळेत या अडीच महिन्याची चिमुकलीला पेंटासह इतर लसी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही मिनिटातच तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. चिमुकलीचं पार्थिव शविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत रुग्णालय प्रशासनानं पार्थिव ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Maharashtra TimesBuldhana News : सनई-चौघड्यांचे सूर, आनंदाच्या वातावरणात दु:खाचं सावट, लाडक्या लेकीच्या लग्नात आक्रित घडलं; मुलीच्या कन्यादानावेळी वडिलांचा करुण अंत
त्यानंतर तिचं पार्थिव आजोबा तुळशीदास मराठे यांनी मांडीवर घेऊन शवविच्छेदन विभागाबाहेर त्यांना रात्र काढावी लागली. काल बुधवारी पहाटे हा संतापजनक प्रकार समोर आला. मृत चिमुकलीचे वडील दीपक बोरसे हे सैन्यात असून सध्या अयोध्या येथे कार्यरत आहेत. ‘शवविच्छेदन रात्री करू नका, पण किमान पार्थिव तरी ठेवा’, अशी विनवणी आजोबा तुळशीदास मराठे यांनी केली. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिल्याचं सांगण्यात आलं आहे. लसीकरण करणाऱ्या यंत्रणेची तसेच रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आजोबांसह नातेवाईकांनी केली आहे.

लसीमुळेच चिमुलकीचा मृत्यू

या चिमुकलीवर काल बुधवारी सायंकाळी टाकळी प्र.चा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘लस देण्यापूर्वी म्हणजे मंगळवारी 12 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत चिमुकलीची प्रकृती चांगली होती. 10.30 वाजता लस घेतल्यानंतर तिच्या हालचाली मंदावल्या’, अशी माहिती आजोबा तुळशीदास मराठे यांनी दिली. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या आजोबांसह नातेवाईकांनी केला आहे.
Maharashtra TimesPune News: चहा-पाण्याला जाताना, डेपोमध्ये बसचं इंजिन सुरूच? ‘पीएमपी’कडून इंधनाची नासाडी; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
बालिकेचा मृत्यू दाखला किंवा पोलिसांनी केलेला पंचनामा घेऊन पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवला पाहिजे होता, किंवा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रशासनाला याबाबत कळविणे गरजेचं होतं. मात्र, त्या मुलीच्या आजोबांकडे कुठलाही मृत्यूचा पुरावा नसल्यानं मृत्यू शवागृहात ठेवणं योग्य नव्हतं. काल बुधवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फोन करून शवविच्छेदन करण्याचं सांगितल्यानंतर तत्काळ पार्थिव ताब्यात घेण्यात आलं’, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा